
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार :आरोपींवर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल. तळा : नजीर पठाण : - तळा शहरातील साजीद हमीद कुरुक्कर या २६ वर्षीय युवकाने लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला मुरूड येथे लाॅजवर नेऊन अत्याचार करीत होता. संमती शिवाय, जबरदस्तीने, अज्ञान पणाचा फायदा उठवत होता. एकतर्फी प्रेमामुळे पिडीत मुलीने स्थानिकांच्या व युवकांच्या मदतीने आरोपी साजिद याला भर शहरातुन चांगलाच चोप देत बाजार पेठेतून धिंड काढीत पोलीसांच्या हवाली केले. आरोपीने फिर्यादीच्या बहिणीला शिवीगाळी करून जीवे ठार मारण्याचीधमकी दिली. सदर घटनातळाबाजारपेठेत समजताच तळेवासियांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सर्वांनी पोलिस ठाणे गाठून आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेची माहिती मिळताच माणगाव उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद पोंदफुले यांनी घटना स्थळी भेट दिली व घटनेचे गांभीर्य समजून सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी विरोधात संतापाची लाट उसळली असून तळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी साजिद कुरुक्कर याला पोलिसांन...