महसूल अधिकारी हा प्रशासनाचा कणा - उपजिल्हाधिकारी दत्तात्रय नवले 

तळा - नजीर पठाण :- महसूल अधिकारी हा प्रशासनाचा कणा असून शासन व जनतेमधील महत्त्वाचा दुवा आहे महसूल विभागाची नाळ शेती व शेतकऱ्यांशी जोडली आहे. जमिनीच्या विविध प्रकरणाशी निगडित असलेल्या आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा ज्याच्याशी संबंध येतो तो महसूल विभाग असल्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण कालमर्यादेत करून नागरिकांचे समाधान होईल असे संवाद घालावे असे मौलिक प्रतिपादन उपजिल्हाधिकारी दत्तात्रय नवले भूसंपादन पनवेल यांनी तळा तहसील कार्यालयात एक ऑगस्ट महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.                                                  

लोकांना विकासात्मक प्रशासन देण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे त्यामुळे लोकांच्या महसूल विभागाकडून खूप अपेक्षा असतात सर्वांनी लोकभिमुख काम करण्याकडे कल वाढवावे असे आवाहन तहसीलदार स्वाती पाटील यांनी केले.यावेळी उपजिल्हाधिकारी भूसंपादन पनवेल दत्तात्रय नवले,तहसीलदार स्वाती पाटील,महसूल नायब तहसीलदार घुगे,महसूल कर्मचारी, शेतकरी आदी मान्यवर उपस्थित होते.तळा तहसील कडून उद्यापासून (ता. १ ऑगस्ट) सोमवारपर्यंत (ता. ऑगस्ट७) महसूल सप्ताह होणार आहे. सप्ताहात युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, कार्यरत, निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासह विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती तहसीलदार स्वाती पाटील यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog