लोकप्रतिनिधींच्या अर्थपुर्ण हितसंबधामुळेच मुंबई गोवा महामार्ग रखडला - एस एम् देशमुख

मुंबई-गोवा महामार्गाचे काम न झाल्यास लोकप्रतीनीधीच्या दारात आंदोलन.

तळा : नजीर पठाण :- रायगड प्रेस क्लबच्या वतीने नागोठणा ग्रामिण पत्रकार संघाच्या सहकार्याने मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम व रस्त्याचीवडखळ ते इंदापूर पर्यत झालेल्यादुरावस्थेच्या विरोधातआज वाकण फाटा येथे बोंबाबोंबआंदोलनाचे आयोजन केले आहे. यावेळी बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व रायगड प्रेस क्लबचे मार्गदर्शन एस.एम.देशमुखांनी या महामार्गाच्याकामात सर्व पक्षिय लोकप्रतिनिधींचे असलेले आर्थिक हितसंबंध हेच महामार्गाच्या विलंबास व दुरावस्थेला कारणीभूत असल्याचा आरोप केला असून गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम पुर्ण न झाल्यास १५ सप्टेंबर रोजी रायगड मधील सर्व लोकप्रतिनिधींच्या दारा समोर पत्रकारांचे बोंबाबोंब आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला.

यावेळी रायगड प्रेसचे अध्यक्ष मनोज खांबे,कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, शरद जाधव राजेंद्र जाधव यांनी कोकणवासीय व सर्व सामान्यांचा महामार्गावरच संताप आंदोलनात व्यक्त केला.कार्याध्यक्ष अष्टीवकर यांनी तडाखेबाज संतापजनक भाषणातून रायगड,कोकणविभागातील खासदार, आमदार नाकर्तेराज्यकर्ते याच्या कार्याची लक्तरे ओरबडून काढली. जनतेचे, महीला भगीनी,गर्भवती महिला,जेष्ट नागरिक,युवापिढी यांचे अपघाती निधन किंवा जायबंदी होत असताना रायगडचे खासदार,आमदार करतात तरी काय?आणि बरेच काही...संताप व्यक्त केला.तर अध्यक्ष मनोज खांबे यांनी तर मोठ्या डबक्यात पोहाणी घेऊन राज्यकर्त्याच्या नावाने बोंबाबोंब करून संताप व्यक्त केला.

 रायगड प्रेस क्लबच्या या बोंबाबोंब आंदोलनात मराठी पत्रकारपरिषदेचे अध्यक्ष शरदपाबळे,कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, सचिव अनिल मोरे, खजिनदार दर्वेश पालकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे रायगड जिल्हा निमंत्रक विजय मोकल, मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागिय सचिवअनिल भोळे,नागोठणेग्रामिण पत्रकार संघाचे संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष महेश पवार आदी पदाधिकारी सर्व तालुका अध्यक्ष व जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog