श्रीदेव राधाकृष्ण नामदेव मंदिरात ३३ श्रीसत्यनारायण महापूजा संपन्न.
तळा : नजीर पठाण :- श्रीदेव राधाकृष्ण नामदेव शिंपी समाज संस्था तळा चे श्री राधा कृष्ण मंदिरात अधिक मासा प्रित्यर्थ दि.१० ऑगस्ट २०२३ रोजी ३३ श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आल्या होत्या.महापुजेचेपौराहित्य संजय केळकर गुरुजी सहकारी रेवंदडा यांनी केले.हिंदू धर्मात या अधिक महिन्याला अधिक महत्त्व असून संस्कृती धार्मिक परंपरा जपली जात असून याचाच एक भाग म्हणून श्री राधाकृष्ण मंदिरात ३३ पुजेचे प्रथमच आयोजन करून पुरुषोत्तम मास (अधिक महिना) साजरा केला. यावेळी अध्यक्ष महेंद्र कजबजे सालकरी व्यवस्थापक पवन रोडे, चंद्रकांत रोडे,श्रीराम कजबजे, नमित पांढरकामे,रघुनंदन रोडे, राकेश वडके,लिलाधर खातू अशा भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून पवित्र अशा धार्मिक संस्कृतीचा वारसा जपला आहे.या धार्मिक सोहळ्याला अनेक भाविकांनी उस्फुर्तसहभाग घेतला.या निमित्ताने दुपारी २ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अनेकभाविकांनी श्रीसत्यनारायण पुजेचा दर्शनाचा तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला.रात्रौ १०वा.भजन अशा धार्मिक कार्यक्रमाने सांगता झाली.
Comments
Post a Comment