कोलाड विभाग काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी हरिओमभाऊ टाळकुटे यांची निवड

तळा : नजीर पठाण :- कोलाड विभाग काँग्रेस कमिटीच्या  अध्यक्षपदी युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री. हरिओमभाऊ टाळकुटे यांची निवड माजी मंत्री सतेज दादा उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते दि.११ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थितीत काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष अध्यक्ष श्री. महेंद्र घरत प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्री. प्रवीणदादा ठाकूर सह प्रभारी श्रीरंग बरगे, महिला प्रदेश चिटणीस मोनिका पाटील, रायगड जिल्हा महिला अध्यक्ष श्रद्धा ठाकूर, प्रदेश चिटणीस श्री. चंद्रकांत ठाकूर जिल्हा अध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उपजिल्हाध्यक्ष जे. टी. पाटील, सुनील थळे, फिशरमॅन अध्यक्ष मार्तंड नाखवा, अल्पसंख्याक अध्यक्ष श्री. अखलाद शिलोके प्रदेश प्रतिनिधी हर्षल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मा. समीर भाई सपकाळ,  रोहा तालुका अध्यक्ष मा. सुनील देशमुख, नागोठणे     शहर अध्यक्ष मा. अश्फाकभाई पानसरे  सर्व तालुकाध्यक्ष व युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ही नवीन जबाबदारी स्वीकारताना भाऊंसोबत मंगेश जाधव, दिनेश जाधव, रुपेश साबळे इत्यादी कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. तसेच याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रवीणदादा ठाकूर यांनी पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले.

हरिओमभाऊ टाळकुटे हे युवा उद्योजक असून सामाजिक कार्यांत ते नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत महाराष्ट्र यात्री म्हणून सहभाग घेतला होता. तसेच या पदाचा वापर श्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली जनतेची सेवा करण्यासाठी व पक्ष संघटन मजबूत बांधण्यासाठी करणार असे मत हरिओमभाऊ टाळकुटे यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog