रायगड परिषद उर्दु शाळा तळा मध्ये स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहाने साजरा.

तळा :-  नजीर पठाण :-  रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा तळा या विद्यालयात १५ऑगस्ट स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.देशाच्या ७६व्या स्वातंत्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मुलांचेभाषणं,देशभक्ती गीते,विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् भारत माता की जय अशा विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला होता.ध्वजा रोहणाचा कार्यक्रम सकाळी ७.३० वाजता होता.शाळेचे मुख्याध्यापक मा. लियाकत राऊत सर यांच्या शुभ हस्ते ध्वज फडकवण्यात आला. या वेळी उपस्थित पाहुणे,विद्यार्थी, शिक्षक,पालक,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थांनी राष्ट्रीय गीत गावून ध्वजास मानवंदना दिली. या नंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त देशभरात राबविण्यात येणाऱ्या "मेरी मिट्टी मेरा देश "या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.तसेच सर्व निपुण लिडर माता पालकांचा प्रमाण पत्र देवून सन्मान करण्यात आला.

 शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ व मिठाई देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा. सिराज खाचे (नगरसेवक,तळा न.प),मा.श् इम्रानशेख(अध्यक्ष,शा.व्यव.समिती).इम्रान परदेसी(उपाध्यक्ष,शा. व्यव.समिती),नजीर पठाण (,पत्रकार)दाऊद खान पठाण, नजीर कडू,सिराज कडू,उमर गोठेकर,इक्बाल गोठेकर,अल्ताफ गोठेकर,आसिफ पठाण,इस्माईल खोपटकर,आ. सत्तार गोलंदाज, शाहिद पालेकर,अब्दुल्ला खान्देशी,हसंमियान परदेसी, सद्दाम राहटविलकर, मौलाना बरकत आली,मौलाना इल्यास हरणेकर, हाजी ताहीर हायस्कूल तळा चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, रा. जि. प उर्दू शाळा तळा चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog