प्राथमिक मराठी शाळा तळा दगडी शाळा येथे जयंती, पुण्यतिथी साजरी.

तळा : किशोर पितळे :- रायगड जिल्हा परीषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा (दगडी शाळा) येथे १ऑगस्ट कै. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व ३१जुलै.कै.जगन्नाथ (नाना) शंकरशेठ पुण्यतिथी व जयंती संयुक्तरित्या  साजरी करण्यात आली. मान्यवरांचे हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात येऊन आदरांजली वाहण्यात आली प्रतिवर्षीलोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी जयंती  साजरी केली जाते. परंतु यावर्षी मुंबईचे शिल्पकार रेल्वेचे जनक कै. नाना शंकर शेठ यांची ३१ जुलै रोजी पुण्यतिथी असते ती आज औचित्य साधून साजरी करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थी तथा पत्रकार किशोर पितळे माध्यमिक स्कूल तळाचे सुहास वावेकर सर मुख्याध्यापिका सौ.जामकर सहशिक्षक बयकर सर,सौमितल वावेकर व सौ. घाडगे,प्रकाश पितळे,सुनिल पितळे विद्यार्थी उपस्थित होते यावेळी विद्यार्थीनींनी लोकमान्य टिळक अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा इतिहास जागा केला यावेळी सुहास वावेकर सर यांनी या महान विभूतीच्या सामाजिक क्षेत्रातील महाराष्ट्राला दिले योगदान कार्याची माहिती विस्तूतपणे सादर करून या महान विभूतीचा आदर्श समोर ठेवून जीवन घडवा असे सांगितले.पत्रकार किशोर पितळे यांनी माणूस हा प्रळत्येक जाती धर्मात जन्माला येत असतो तो समाजाचा असतो.पण अशा काही महान व्यक्ती समाजासाठी ज्ञान,दान,कर्म करुन देशासाठी समाजासाठी योगदान देतात तेव्हा ते समाजाचे न रहाता बहुजनांचे होतात.या अशा या महान विभूतीची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते.३१जुलै कै.नाना शंकरशेठ सर्वच ठिकाणी साजरी केली जाते.त्यांचा इतिहास भावी पिढीला ज्ञात व्हावा आदर्श घ्यावा या उद्देशाने आयोजन केले आहे.कै.नाना शंकरशेट यांच्या महाराष्ट्राला दिलेले योगदानाची माहिती देऊन महाराष्ट्राची मुंबई हि राजधानी देशाचा आर्थिक कणा मुंबई आहे.ती बनवण्यात दिलेले मोठे योगदानहेमहान कार्य असून मुंबई ही मराठी माणसांचीच आहे.म्हणून नानांना मुंबईचे शिल्पकार म्हणून संबोधले जाते त्यांच्या कार्याचा गौरव प्रतिवर्षी शाळांमधून साजरा केला जावा अभ्यासबक्रमात समावेश करावा याची शासनाने दखल घ्यावी अशी यावेळी मागणी करण्यात आली.यावेळी पत्रकार किशोर पितळे यांनी मुलांना खाऊ दिला १०० मुलांची उपस्थीती होती कु.शर्वरी बयकर व श्रावणी मोरे  या मुलीनी भाषणे केली कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सह शिक्षिका मितल वावेकर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog