राहाटाड ग्रामपंचायतीच्या सरपंच मिताली करंजे परतल्या स्वगृही
खा. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँगेस मध्ये जाहीर प्रवेश.
तळा : नजीर पठाण :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रहाटाड ग्रामपंचायत सरपंच मिताली करंजे सह ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक कार्यकर्त्यांनी आज (६ ऑगस्ट) रोजी रहाटाड येथील सामाजिक सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.खा.सुनील तटकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. दी.१७ जुलै २०२२ रोजी रहाटाड गावाने ग्रामपंचायत सदस्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला होता या गोष्टीला आज एक वर्ष होऊन गेले याच ग्रामस्थांनी पुन्हा स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे रहाटाड गावात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.या पक्ष प्रवेशासाठी खा. सुनील तटकरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नाना भौड, रायगड जिल्हा युवती अध्यक्षा सायली दळवी, उपजिल्हा अध्यक्ष कैलास पयगुडे, मागासवर्गीय सेल रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड. उत्तम जाधव, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे महिला अध्यक्ष जान्हवी शिंदे माजी राजीप सदस्य गीता जाधव,युवक अध्यक्ष नागेश लोखंडे,किशोर शिंदे,जगदीश शिंदे,मंगेश भगत, इस्माईल पल्वकर,तन्वीर पल्वकर, वरंडे , देवजी बोरडे आदी मान्यवर उस्थितीत होते.
यावेळी खा. सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की रहाटाड गावा सोबत गेली ३५ वर्षे ऋणानुबंध आहेत या ग्रामपंचायतीमध्ये अनेक कामे माझ्या माध्यमातून झाली असल्याचे ग्रामस्थ त्यांच्याच भाषणात सांगत आहेत. सरपंच यांनी देखील कुठल्याही प्रकारचा विकास माझ्याकडून झालेला नाही असे कबूल केले परंतु मधल्या काळात काही सहकारी दुसऱ्या विचारधारेशी जोडले गेेले होते परंतु ते आज राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आले आहेत त्यांचे मी स्वागत करतो.
महाराष्ट्राच्या हितासाठी आपण महायुतीत सामील झालो आहोत सामील झाल्या नंतर आपल्या सहकार्याने ज्यांना आमदार होता. आले त्या आपल्या कन्या आज मंत्री झाल्या आहेत या मंत्री मंडळातील अदिती एकमेव महिला मंत्री आहे. या सर्व गोष्टी नशिबात असाव्या लागतात मंत्री झाल्या नंतर दिलेली जवाबदारी पार पाडण्याचे काम अदिती कडून होत आहे जे खाते मिळाले आहे त्या खात्याचा जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम ती करत आहे. संधी ही एकदाच मिळत असते त्या संधीच सोन करण आपल्या हातात असते असे सांगून सरपंच करंजे यांना देखील पुन्हा चांगली संधी मिळाली असून त्यांच्या विकासाचे स्वप्न पूर्ण केले जाईल असे सांगून मागील सर्व विसरून आपण सर्व कामाला लागुया असे सांगितले.
सरपंच मिताली करंजे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी जनतेतून निवडून गेलेली सरपंच आहे मी सरपंच होऊन आज आठ महिने झाले परंतु कुठल्याही प्रकारचा विकास माझ्याकडून झालेला नाही पण तळा शहर आणि ग्रामीण विभागात खा. सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून सुरू असलेली विकासकामे लक्षात घेता राष्ट्रवादी काँगेसच विकास करू शकते त्यामुळे खा. सुनील तटकरे यांच्यावर विश्वास ठेऊन मी पुन्हा राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment