श्री काळकाई देवी प्रसन्न वृद्धाश्रम संभे येथे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त फलाहार वाटप
तळा : नजीर पठाण :- श्रीमती सुनंदा मोहिते संचालित श्री काळकाई देवी प्रसन्न वृद्धाश्रम येथे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त फलाहार वाटप कार्यक्रम कोलाड विभाग कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरिओम भाऊ टाळकुटे यांच्या संकल्पनेतुन १४ ॲागस्ट रोजी पार पडला यावेळी विभाग कमिटीचे प्रमुख कार्यकर्ते दिनेश जाधव ,मंगेश जाधव,लक्ष्मण पवार सह रुपेश साबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
हा कार्यक्रम रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष समिरभाई सकपाळ ,रोहा तालुका काँग्रेस अध्यक्ष मा.सुनिलदादा देशमुख ,नागोठणे शहर अध्यक्ष मा.अश्फाकभाई पानसरे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला
यावेळी विलासराव देशमुख साहेबांच्या स्मृतींचा जागर करताना वृध्दाश्रम परिवारातील सदस्य श्री.हजारे आजोबा यांनी विलासराव देशमुख साहेबांनी किल्लारी भुकंपावेळी केलेल्या कामाच्या आठवणी सांगितल्या तर यावेळी बोलताना हरिओम भाऊ टाळकुटे यांनी विभागीय काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित कार्यकारणीचा पहिलाच कार्यक्रम हा आमचे आदर्श विलासराव देशमुख साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी होणे हा चांगला योग असल्याचे सांगुन विलासरावांच्या कार्यपद्धतीचा व जीवनचरित्राचा आदर्श ठेवुन वाटचाल करणार असल्याचे सांगितले व सुनंदा मोहिते मॅडम यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सहकार्य केल्याबदद्ल आभार व्यक्त केले. आश्रमाच्या संचालिका सुनंदा मोहिते मॅडम यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.
Comments
Post a Comment