सोनसडे ग्रा. पं. मध्ये लोकप्रतिनिधींनी व नागरीकांनी घेतली पंच प्रण प्रतिज्ञा!
तळा : नजीर पठाण :- शासनाच्या आदेशानुसार मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत सोनसडे ग्रामपंचायतीमध्ये पंच प्रण प्रतिज्ञेचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी सरपंच माधुरी पारावे,उपसरपंच, सदस्य, गाव अध्यक्ष, प्रतिष्ठित मंडळी, सोनसडे अध्यक्ष देवजी गावडे, कलमशेत अध्यक्ष जानु अडखळे, वावेहवेली अध्यक्ष महादेव पारावे ग्रां .पं.सदस्य परशुराम वरंडे, ग्रामसेवक उमाजी माडेकर, माजी सरपंच लक्ष्मण खांडेकर, मुख्याध्यापिका नेहा तार, उप शिक्षक, विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्वानी उभे राहून हातात दिवे घेऊन प्रतिज्ञेचे सामुहिक पठन केले. यानंतर ग्रामसेवक उमाजी माडेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाची माहीती दिली. १३ ते १५ ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा फडकवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
Comments
Post a Comment