अधिकाऱ्यांचे गोबरे गाल, नागरिकांचे हालच हाल’ विकास नको, उच्चस्तरीय चौकशीची तळेवासियांची मागणी.

तळा : किशोर पितळे :- तळा नगरपंचायत बाजारपेठ मुख्य मार्गावर पुर्ण झालेले सिमेंट रस्त्याचे कामअत्यंत निकृष्ट दर्जाचे असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत रस्त्यावरील खडी बाहेर पडली असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम करण्याचा आव आणणाऱ्या ठेकेदारावर बाजारपेठेतील मार्गावरील कामाचा दर्जा बघितल्यास या ठेकेदारावर अभियंत्यांनी आतापर्यंत ब्लॅक लिस्टेड का केले नाही, असा सवाल तळेवासियांनी निर्माण केला आहे.या मार्गावर पूर्ण केलेले सिमेंट रस्त्याचे काम नियमानुसार झालेले नाही.त्यात वापरले जाणारे साहित्य सुमार आहेरस्त्यात ग्रिटचेप्रमाणकिती  असावे तितके नाही.सिमेंटच्या ग्रेडची तपासणी त्रयस्थ संस्थेने केल्यास त्यातील सत्य बाहेर येईल.

सत्ताधारी पक्षाने नगरपंचायत हिसकावून सत्तेभरात मोठा निधी आणून शहरातील मुख्य रस्त्याला ५६लाखमंजूर करून मोठ्या आवेशात कामाला सुरुवात करून ठेकेदार सब ठेकेदार यांनी कामाची क्वालिटी न देता  गेल्या पावसातच वाट लागली जनतेच्या करोडो रुपयांची ही कामे केवळ पैसे ओरबाडून नेण्यासाठी केले जात असावे असे वास्तवादी चित्र आहे. विशेष असे की, नगरपंचायतीचे अभियंता हे त्या ठेकेदाराच्या दावणीला बांधल्यागत मूग गिळून गप्प आहेत. ज्यांनी काटेकोरपणे लक्ष ठेवावे, तेच या लुटीला बळ देत असतील तर सार्वजनिक बांधकाम खाते कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सिमेंट रस्त्याची दोन वेळा दुरुस्ती करण्यात आली तरी देखील रस्त्याची खडी बाहेर पडली आहे याचा अर्थ या कामाचा दर्जा सामान्य माणसालाही सांगता येणे शक्य असताना नगरपंचायत बांधकाम विभागाचे इंजिनीयर प्रशांत माने यांना ते कसे ठाऊक नाही? असे सवाल उपस्थित करून ‘अधिकाऱ्यांचे गोबरे गाल, नागरिकांचे हालच हाल’ असा नारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.‘- हे तर जुलमी शासन!’जणू जुलमी शासनाने अत्याचार करावे,असा नजारा तळाबाजारपेठेतीलनागरिकांबाबत बघावयास मिळतो. 'विकास नको, रस्ता आवर' अशी तेथे स्थिती निर्माण झाली आहे. जवळ जवळ दोन महिने दुकानासमोर सिमेंट रस्त्याचे कामसुरू असल्याने जाणे येणे बंद होते. बाजारपेठेत नागरिकांचे येणे जाणे बंद झाले होते आणि आता रस्ता पूर्ण झाल्या नंतर रस्त्यावरील पाणी गाड्यांच्या वाहतुकीमुळे दुकानात उडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.मोदी नाका ते मराठी शाळा रस्ता मागील वर्षीच तयार केला आजची परिस्थिती बिकट असून या मार्गावरून नगरसेवक,नगराध्यक्षा येत जात असताना देखील परिस्थीती बद्दल मूग गिळून असल्याचे दिसून येत आहे.जनतेला मनस्ताप देऊन ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे खिसे भरणारा हा सिमेंट रस्त्याचा विकास येथील लोकप्रिनिधींना अपेक्षित होता काय? असा सवाल मेटाकुटीस आलेले नागरिक विचारत आहेत.अभियंता करणार काय कारवाई?रस्त्याला खड्डे पडलेत काम निकृष्टअसल्याची नागरिकांची तक्रार आहे. गुणवत्तेशी तडजोड करून अधिकाऱ्यांच्या संगनमतानेअर्थपुर्णची लयलूट सुरू आहे.कोकण विभागीय मुख्य अभियंता गुणवत्ता नियंत्रण अधिकारी कोकण भवन यांनी याबाबत चौकशीचे आदेश देणे अत्यावश्यक आहे. अधिकारीच संशयाच्या भोवऱ्यात असल्यामुळे त्यांनी स्वच्छ प्रतिमेच्या त्रयस्थ संस्थेचीही यात सोबत घेतल्यास कारवाईत पारदर्शकता असेल. त्यामुळेया रस्त्याचे काय करणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून आहे.

Comments

Popular posts from this blog