हिंदू जनजागृती समितीच्या वतीने खोपोली येथे आयोजित केलेल्या प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) :- हिंदू जनजागृती समितीच्या वतीने खोपोली येथे आयोजित केलेल्या प्रथोमचार शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील श्री समर्थ कृपा ग्रीन हाऊस येथे 6 सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या या शिबिरात छातीदाबन कसे करावे ? सर्पदंश आणि श्वानदंश झाल्यास रुग्णाची स्थिती गंभीर होऊ नये यासाठी काय प्रथमोपचार करावेत !, अपघातग्रस्त रुग्णाचे शिरस्त्राण (हेल्मेट) कसे काढावे !, रुग्णाला 'स्ट्रेचर'वरुन कसे न्यावे आदी प्रात्यक्षिके दाखवून ते उपस्थितांकडून करवून घेतले. यावेळी उपस्थित शिबिरार्थींपैकी श्री.रमेश लबडे, कु.नम्रता चव्हाण ,सौ.रेश्मा जोशी यांनी उत्स्फुर्त प्रतिक्रिया देताना म्हणाले की, 'असे उपक्रम समाजात होणे फार गरजेचे आहे. तुम्ही आम्हाला हा विषय शिकवा. प्रथमोपचार शिकल्यामुळे डॉक्टरांकडे जाईपर्यंत रुग्णाचे जीवित रक्षण करू शकतो हा आत्मविश्वास आमच्यामध्ये यामुळे वाढेल'. 'बाहेरील देशांम...
Posts
Showing posts from September, 2023
- Get link
- X
- Other Apps
श्रीवर्धनच्या भामट्याला कोलाड पोलिसांनी नशाकारक अवैध अमली चरस विक्री करताना रंगेहाथ पकडले,गुन्हा दाखल. कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) :- कोलाड येथे अवैध धंदे करणाऱ्यांवर कोलाड पोलिसांचा चांगलाच चाप बसला असून कोलाड रोहा राज्य मार्गावर हॉटेल मराठा पॅलेस समोर एका अवैध नशाकारक अमली चरस विक्री करणाऱ्या भामट्याला रंगेहाथ पकडले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. गेली अनेक दिवस हा श्रीवर्धन येथे राहणारा भामट्या कोलाड येथे येऊन अवैध नशाकारक अमली चरस विक्री करत असल्याची कुणकुण तशी गुपचूप चर्चा कोलाड नाक्यावर घुमसत होती मात्र त्यावर पारथ ठेऊन अखेर त्यास पकडण्यात कोलाड पोलिसाना अखेर रविवारी 10 सप्टेंबर रोजी रात्री यश आले.तर सदरचा भामटा अन्य चरस हा मादक व नशाकरक आमली पदार्थाची भवैदयपणे विक्री करत असल्याने त्यास कोलाड पोलिस उपनिरीक्षक अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बरोबर साफला रचून देवेंद्र जयदास पाटील, वय २६, रा. वरचा जिवना राममंदीराजवळ ता श्रीवर्धन जि रायगड यास कोलाड रोहा मार्ग हॉटेल मराठा पॅलेस समोर विक्री करत असताना कोलाड पोलिसांनी पकडले आहे. कोलाड पोलिसांकडून ...
- Get link
- X
- Other Apps
तळा येथील टोकार्डे गावानजीक एसटी आणि दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू तळा (नजीर पठाण) : - तळा शहरानजीक असलेल्या टोकार्डे गावाजवळ एसटी बस आणि एका दुचाकीची समोररामोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मदन बाळकृष्ण देवघरकर वय, ४८, रा. जाधववाडी, ता. रोहा असे मृताचे नाव असून तो बांधकाम व्यावसायिक होता. त्याच्या मागे त्याची पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.. मदन बाळकृष्ण देवघरकर हे सकाळी भाजीपाला आणण्यासाठी तळा येथे गेले होते पुन्हा घराकडे जात असताना वाटेतच टोकार्डे गावाजवळ त्यांचा अपघात होऊन त्यांचा निधन झाले. सदरची घटनेची नोंद तळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तळा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
- Get link
- X
- Other Apps
गुटखा बंदी नंतरही विक्री 'ओक्के' मध्येच; भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आश्रयाखाली अवैध व्यवसाय सुरु? तळा : नजीर पठाण :- शहर किंवा ग्रामीणमधील पानटपरीवर अल्पवयीन मुलांना व तरुणांना पुडीत बांधून किंवा गुंडाळून गुटखा दिला जातो. दहा वर्षे पूर्ण झाली गुटखा बंदी होऊन, पण गुटखा विक्री होत असतानाही अन्न-औषध प्रशासनाने कारवाई करायची की पोलिसांनी करायची, असा दोन्ही विभागात हद्द आणि अधिकाराचा वाद असल्याची चर्चा आहे. शहराच्या सीमेवर पोलिसांचे तपासणी नाके असतानाही गुटखा येतोच कसा, या प्रश्नाचे ठाम उत्तर दहा वर्षांत कोणताही अधिकारी देऊ शकला नाही. राज्यात २० जुलै २०१२ रोजी गुटखा बंदीचा निर्णय झाला. पण, त्याला दहा वर्षे पूर्ण झाली. पण, ना त्याची कडक अंमलबजावणी ना गुटखा विक्री थांबली, असे चित्र आहे. शेजारील म्हसळा तालुक्यातून गुटखा मोठ्या प्रमाणावर येतो. गुटखा बंदीनंतर अनेकांनी मावा विक्रीचा नवा व्यवसाय सुरु केला. पान टपऱ्यांवर मावा आणि गुटखा दोन्ही उपलब्ध आहेत, अशी स्थिती आहे. तरूणांना व्यसनाधिनतेपासून दूर ठेवून निरोगी, सदृढ समाजाच्या निर्मितीसाठी हातभट्टी दारू, गुटखा, मावा विक्रीवर कडक ...
- Get link
- X
- Other Apps
विकासासाठी आपण सरकारमध्ये सामील झालो असून परिवार म्हणून काम करत आहोत - खा.सुनील तटकरे काकडशेत सरपंच शरद सारगे यांचा ग्रामपंचायत सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश तळा : नजीर पठाण :- राजाच्या विकासासाठी आपण सरकारमध्ये सामील झालो असून, परिवार म्हणून काम करत आहोत, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून, राज्यातले प्रश्न सोडवता येणार असल्याचं अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. तळा तालुका येथे पक्ष मेळावा आणि जाहीर प्रवेश कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यां समवेत संवाद साधला यावेळी काकडशेत ग्रामपंचायत सरपंच शरद सारगे यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला खा.सुनील तटकरे यांनी पुष्गुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाल घालून त्यांचे स्वागत केले या पक्ष सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष नाना भौड,नगराध्यक्ष माधुरी घोलप,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे,शहर अध्यक्षा मेघा सुतार, मागासवर्गीय रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.उत्तम जाधव,जिल्हा उपाध्यक्ष कैलास पायगुडे,माजी स...