तळा येथील टोकार्डे गावानजीक एसटी आणि दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू 

तळा (नजीर पठाण) : - तळा शहरानजीक असलेल्या टोकार्डे गावाजवळ एसटी बस आणि एका दुचाकीची समोररामोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. 

मदन बाळकृष्ण देवघरकर वय, ४८, रा. जाधववाडी, ता. रोहा असे मृताचे नाव असून तो बांधकाम व्यावसायिक होता. त्याच्या मागे त्याची पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.. मदन बाळकृष्ण देवघरकर हे सकाळी भाजीपाला आणण्यासाठी तळा येथे गेले होते पुन्हा घराकडे जात असताना वाटेतच टोकार्डे गावाजवळ त्यांचा अपघात होऊन त्यांचा निधन झाले. सदरची घटनेची नोंद तळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तळा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog