हिंदू जनजागृती समितीच्या वतीने खोपोली येथे आयोजित केलेल्या प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) :- हिंदू जनजागृती समितीच्या वतीने खोपोली येथे आयोजित केलेल्या प्रथोमचार शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील श्री समर्थ कृपा ग्रीन हाऊस येथे 6 सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या या शिबिरात छातीदाबन कसे करावे ? सर्पदंश आणि श्वानदंश झाल्यास रुग्णाची स्थिती गंभीर होऊ नये यासाठी काय प्रथमोपचार करावेत !, अपघातग्रस्त रुग्णाचे शिरस्त्राण (हेल्मेट) कसे काढावे !, रुग्णाला 'स्ट्रेचर'वरुन कसे न्यावे आदी प्रात्यक्षिके दाखवून ते उपस्थितांकडून करवून घेतले.
यावेळी उपस्थित शिबिरार्थींपैकी श्री.रमेश लबडे, कु.नम्रता चव्हाण ,सौ.रेश्मा जोशी यांनी उत्स्फुर्त प्रतिक्रिया देताना म्हणाले की, 'असे उपक्रम समाजात होणे फार गरजेचे आहे. तुम्ही आम्हाला हा विषय शिकवा. प्रथमोपचार शिकल्यामुळे डॉक्टरांकडे जाईपर्यंत रुग्णाचे जीवित रक्षण करू शकतो हा आत्मविश्वास आमच्यामध्ये यामुळे वाढेल'. 'बाहेरील देशांमधे जसे प्रथमोपचार शिकविले जाते, तसे आपल्याकड़ेही प्रत्येकाला हे शिकविले जावे असे वाटते. हिंदू जनजागृती समितीचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे असे उपक्रम नियमित व्हावेत ही सदिच्छा !'
Comments
Post a Comment