गुटखा बंदी नंतरही विक्री 'ओक्के' मध्येच; भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आश्रयाखाली अवैध व्यवसाय सुरु?

तळा : नजीर पठाण :- शहर किंवा ग्रामीणमधील पानटपरीवर अल्पवयीन मुलांना व तरुणांना पुडीत बांधून किंवा गुंडाळून गुटखा दिला जातो. दहा वर्षे पूर्ण झाली गुटखा बंदी होऊन, पण गुटखा विक्री होत असतानाही अन्न-औषध प्रशासनाने कारवाई करायची की पोलिसांनी करायची, असा दोन्ही विभागात हद्द आणि अधिकाराचा वाद असल्याची चर्चा आहे. शहराच्या सीमेवर पोलिसांचे तपासणी नाके असतानाही गुटखा येतोच कसा, या प्रश्नाचे ठाम उत्तर दहा वर्षांत कोणताही अधिकारी देऊ शकला नाही.

 राज्यात २० जुलै २०१२ रोजी गुटखा बंदीचा निर्णय झाला. पण, त्याला दहा वर्षे पूर्ण झाली. पण, ना त्याची कडक अंमलबजावणी ना गुटखा विक्री थांबली, असे चित्र आहे. शेजारील म्हसळा तालुक्यातून गुटखा मोठ्या प्रमाणावर येतो. गुटखा बंदीनंतर अनेकांनी मावा विक्रीचा नवा व्यवसाय सुरु केला. पान टपऱ्यांवर मावा आणि गुटखा दोन्ही उपलब्ध आहेत, अशी स्थिती आहे. तरूणांना व्यसनाधिनतेपासून दूर ठेवून निरोगी, सदृढ समाजाच्या निर्मितीसाठी हातभट्टी दारू, गुटखा, मावा विक्रीवर कडक निर्बंध घातले. पण, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे त्याचे पालन होत नाही. काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आश्रयाखाली अवैध व्यवसाय सुरु असतात, असेही अनेकदा समोर आले आहे. कारवाई न करता सुरु असलेल्या गुटखा, मावा विक्रीची दरवर्षीची उलाढाल कोट्यवधीत असल्याचेही चित्र आहे.

 तोंडाचे आंकुचन, तरीही नाद सोडला नाही, गुटख्यात सुपारीवर प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे तो आरोग्यासाठी घातक व धोकादायक असते. त्यात मॅग्नेशिअम कार्बोनेट सारखे घातक घटक असतात. त्याचा दुष्परिणाम गालाच्या आतील आवरणावर होतो. गुटखा खाणाऱ्यांचे तोंड आकुंचन पावते. त्याला व्यवस्थित जेवताही येत नाही आणि त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे तरूणांच्या आरोग्यावर वाईट परिणाम दिसत असल्याचे कर्करोगतज्ज्ञ सांगतात. तरीपण, गुटखा, मावा खाणाऱ्यांनी त्याचा नाद सोडला नाही, हे विशेष

शाळा-महाविद्यालयातील मुलांना व्यसन लागू नये म्हणून शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळा परिसरात गुटखा, दारू विक्री करण्यावर ठराविक अंतराचे निर्बंध आहेत. पण, त्याची अंमलबजावणीच झालेली नाही. त्याकडे ना शिक्षण विभाग ना पोलिस ना अन्न व औषध प्रशासनाने गांभीर्याने पाहिले. पण, दुर्दैवाची बाब म्हणजे आज शाळांमध्येही व्यसनमुक्तीचे शिबिर घ्यावे लागतात.

Comments

Popular posts from this blog