विकासासाठी आपण सरकारमध्ये सामील झालो असून परिवार म्हणून काम करत आहोत - खा.सुनील तटकरे

काकडशेत सरपंच शरद सारगे यांचा ग्रामपंचायत सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश

तळा : नजीर पठाण :- राजाच्या विकासासाठी आपण सरकारमध्ये सामील झालो असून, परिवार म्हणून काम करत आहोत, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून, राज्यातले प्रश्न सोडवता येणार असल्याचं अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. तळा तालुका येथे पक्ष मेळावा आणि जाहीर प्रवेश कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यां समवेत संवाद साधला यावेळी काकडशेत ग्रामपंचायत सरपंच शरद सारगे यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला खा.सुनील तटकरे यांनी पुष्गुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाल घालून त्यांचे स्वागत केले या पक्ष सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष नाना भौड,नगराध्यक्ष माधुरी घोलप,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे,शहर अध्यक्षा मेघा सुतार, मागासवर्गीय रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.उत्तम जाधव,जिल्हा उपाध्यक्ष कैलास पायगुडे,माजी सभापती अक्षरा कदम,माजी राजिप सभापती गीता जाधव,स्वीकृत नगरसेवक महेंद्र कजबजे,युवक अध्यक्ष नागेश लोखंडे,रवी मांडवकर,सरपंच निकिता गायकवाड,माजी सरपंच ज्योती पायगुडे देवा रामाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 तटकरे पुढे म्हणाले की मी जरी विकासकामांसाठी तिथे गेलो असलो, तरी मी शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारेतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे.राज्यात मोठ्या प्रमाणावर केंद्राचा निधी यावा, तसेच राज्यातील विकासकामांना मदत व्हावी आम्ही कामाला झोकून देणारी माणसं आहोत त्यामुळेच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश होत आहे.१९९९ मध्ये या तालुक्याची निर्मिती झाली काही दिवसांनी या तालुक्याचा रौप्य महोत्सव साजरा केला जाईल या रौप्य महोत्सवातून आपण केलेल्या प्रगतिशील कामांचा निरनिराळ्या उपक्रमांतून उपलब्धि आणि भविष्याचा वेध घेतला जाईल तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात तळा तालुका हा पहिल्या क्रमांकावर असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 आपल्या आशीर्वादाने आपली मुलगी बहीण अदिती तटकरे यांना आपण माझ्या पेक्षा जास्त मताधिक्याने विधानसभेवर पाठवले आज ती मंत्री मंडळात एकमेव महिला मंत्री आहे.अदितीने द्रोणगिरी, कुडा लेणी,तळगड किल्ला यासाठी पर्यटन विकास निधी मंजूर केला होता त्याला ब्रेक लावण्यात आला होता परंतु आता या कामांना निधी मिळणार असून पर्यटनाच्या दृष्टीने तालुक्याचे महत्व वाढणार आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.सरपंच शरद सारगे यांनी योग्य निर्णय घेतला असून मी पक्षाचा प्रांताध्यक्ष म्हणून त्यांचे पक्षात स्वागत करतो.मधल्या कालखंडात काही मतांतर आमच्यात झाली होती पण आपल्या विभागाचा विकास व्हावा ही सारगे यांची भूमिका असून विकासकामे कमी पडू देणार नसल्याचे खा.तटकरे यांनी सांगितले व सर्वांचे पक्षात स्वागत केले. 

मी चार महिन्यांपूर्वी काकडशेत ग्रामपंचायतीचा सरपंच झालो लोकांनी मला या ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी निवडून दिले परंतु गेल्या चार महिन्यात केवळ नारळ फोडण्याचे काम माझ्याकडून झाले कोणतेही काम पूर्ण करू शकलो नाही थेट जनतेने मला निवडून दिले आहे त्यांची कामे केली नाही तर माझा सरपंच होऊन काय उपयोग रायगड जिल्ह्यात खा तटकरे यांचाच दबदबा असून तेच विकासकामे करू शकतात.मधल्या काळात वेगळी वाट धरली असली तरी आता खा.तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,उत्तम जाधव यांनी देखील मार्गदर्शन केले.

 काकडशेत ग्रामपंचायत सदस्य प्रगती राऊत,लक्ष्मी दिवेकर,काकडशेत अध्यक्ष नरेश राऊत,माजी अध्यक्ष प्रदीप राऊत,शाखा प्रमुख प्रमोद सकपाळ,अभिषेक महाडिक,अमित ठसाळ,विनायक सारगे, धोंडू घाटवळ,शैलेश महाडिक,हरिश्चंद्र घाटवळ, गणपत घाटवळ, यशवंत दर्गे गणेश दर्गे सचिन अँकर राम सारखे नथुराम तळकर केशव धुमाळ शिवराम दर्गे सुरेश वाजे पांडुरंग तटकरे मधुकर सारगे संतोष महाडिक केरु रिकामे धोंडू घाटवळ, लक्ष्मण घाटवळ, दामू शिंदे,पांडू शिंदे,भरत भोसले, सदा मोरे,प्रशांत शिर्के, सदानंद मोरे, किशोर भोसले शशिकांत नगरकर, अंकित मिरगळ शशिधर,पवार मिलिंद यादव राजेश राऊत स्वराज राऊत नथुराम तळकर सुनील इंगवले दिगंबर कदम सिद्धेश तापकीर केशव धुमाळ या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

 राजकीयदृष्ट्या महत्वाची असणाऱ्या काकडशेत ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पोट निवडणूक दिनांक १८.५.२३ रोजी पार पडली होती या निवडणुकीत शरद सारगे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून सरपंच पदाची निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतीक्षा मोरे यांचा पराभव करत या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या शिवसेनेचा झेंडा फडकवला या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसला होता परंतु केवळ चार महिन्यांच्या कालावधी नंतर अचानक सरपंच शरद सारगे यां चीनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून शिवसेना शिंदे गटाला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Comments

Popular posts from this blog