Posts

Showing posts from October, 2023
Image
 1 नोव्हेंबर रोजी वीज कंत्राटी कामगारांचा मंत्रालयावर मोर्चा उरण :- प्रतिनिधी :- राज्यातील महावितरण, महापारेषण, व महानिर्मिती कंपनीतील नियमित मंजूर रिक्त पदांवर मागील 15 ते 20 वर्षेपासून फक्त 14 हजार, 15 हजार रूपये प्रतिमाहे  काम करत असलेल्या अनुभवी व कुशल वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजंदारी पद्धतीने वयाच्या 60 वर्षा पर्यंत जॉब सिक्युरिटी देऊन सेवेत सामावून घ्यावे अथवा समान काम समान वेतन द्यावे या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय  महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) संघटनेच्या पुणे येथील भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात 7 व 8 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या केंद्रीय कार्यकारिणी बैठकीत झाला. या बैठकी साठी राज्यातील 28 जिल्ह्याचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. संविधानिक शासकीय देय रकमेचा अपहार करणाऱ्या व कामगारांचे आर्थिक शोषण करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. अन्याय ग्रस्त कामगारांना कामावर घ्यावे व प्रलंबित धोरणात्मक निर्णय होईपर्यंत या कामगारांना 20,000 पगा...
Image
  राजेश पाटील यांनी दिले अजगराला जीवनदान  उरण : प्रतिनिधी :- उरण तालुक्यातील चिरनेर येथील खारपाटील वेअर हाऊस मधील भोमालगत असलेल्या अगरवाल कंपनीच्या आवारात नऊ फुटाचा तसेच 18 किलो वजनाचा अजगर आढळून आला असता तेथील कर्मचाऱ्यांनी फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) संस्थेच्या हेल्पलाईन वर कॉल केला असता संस्थेचे सर्पमित्र  राजेश पाटील हे सदर ठिकाणी जाऊन त्या अजगराचा रेस्क्यू केला.त्यासोबत तिथे उपस्थित असलेल्या कामगारांना  सापाची माहिती दिली.दिवसेंदिवस  कमी होत चाललेली जंगले व त्यामुळे धोक्यात आलेले वन्यजीव नागरी वस्तीत दिसू लागले आहेत.असा कुठला जीव आपल्या घरपरिसरात दिसला तर त्याला न मारता संस्थेच्या हेल्पलाईन वर कॉल करून त्याला वाचविण्याचा प्रयत्न करा असे आवाहन राजेश पाटील यांनी केले.
Image
  सेझग्रस्त शेतकऱ्यांनो “तुमचे होईल ते आमचे होईल"या भ्रमात राहु नका :- ऍड.दत्तात्रेय नवाळे उरण : प्रतिनिधी :- सन २००५ मधे उरण, पेण व पनवेल तालुक्यातील ४५ गावामधे विशेष आर्थीक क्षेत्र स्थापन्याकरीता महाराष्ट्र शेतजमिन अधिनीयम १९४८ चे कलम ६३ अनुसार व तेव्हाचे विकास आयुक्त (उद्योग) यांचे दिं. १६ जुन २००५ चे परवानगी नुसार जमिन मिळकती मे मुंबई इनटीग्रेट एस. ई.झेड लि. कंपनीला खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली होती. सदरची कंपनी १५ वर्षामधे सदरच्या जमीन मिळकतीवर प्रकल्प उभा करण्यास असमर्थ ठरली तर सदरची जमिन मिळकत ज्या शेतकऱ्याकडुन विकत घेतली आहे त्या शेतकऱ्यांना त्यांनी मागणी केल्यास सदर जमिन मिळकत कंपनीकडुन मुळ किंमतीस परत विकत घेण्याचा अधीकार राहील.अशा प्रकारे कंपनीने खरेदी केलेली जमिन मिळकत १५ वर्षात न वापरल्यामुळे मार्च २०२२ पासुन ५२३ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी रायगड यांजकडे कंपनीने खरेदी केलेल्या जमिन मिळकती परत करण्याकरता उरण, पेण, पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यां तर्फे चौकशी अर्ज दाखल केले. त्यावर सुनावणी होऊन फेब्रुवारी २०२३ मधे प्रकरण अंतीम आदेशाकरीता ठेवण्यात आले. आत्ता जिल्हाधीकारी अल...
Image
  ज्ञानांकुर  इंग्लिश मेडीयम स्कूल खांबच्या विद्यार्थ्यांचे तालुका स्तरावरील विविध स्पर्धेत सुयश, विविध स्थरावरून अभिनंदन   कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) :- रोहा तालुक्यातील खांब येथील ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कूल येथील विद्यार्थ्यांनी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव येथे झालेल्या विविध क्रिडा स्पर्धेत यश संपादन केले असुन सर्व यशश्वि विद्यार्थ्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. सानेगाव येथे झालेल्या क्रिडा स्पर्धेत आर्या रविंद्र लोखंडे (उंच उडी प्रथम ),कनिका नितीन कचरे (२०० मिटर धावणे प्रथम)कनिका नितीन कचरे (४०० मिटर धावणे  प्रथम)हर्ष संदिप महाडिक(४०० मिटर धावणे प्रथम)आदेश प्रदीप लाडगे (लांब उडी प्रथम)तसेच मधुरा गणेश कोस्तेकर (थाळी फेक द्वितीय)अक्षरा रविंद्र मरवडे  (१५०० मिटर धावणे द्वितीय)साहिल सचिन गोळे (उंच उडी द्वितीय),श्रुती प्रकाश धनावडे (गोळा फेक तृतीय), आर्या महेश चितळकर (२०० मिटर धावणे तृतीय),वैष्णवी दिपक खराडे (उंच उडी तृतीय),कनिका नितीन कचरे (लांब उडी तृतीय )कर्तव्य सुधीर लोखंडे (थाळी फेक तृतीय), विघ्नेश घनश्याम ना...
Image
  मुंबई गोवा महामार्गावर कोलाड येथे आपघात प्रवाशी महीला जागीच ठार,दोनजण जखमी रिक्षाची टेम्पोला धडक.  कोलाड (विश्वास निकम,रायगड भुषण) :- मुंबई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावर रिक्षा आणि मालवाहू टेम्पो यांच्यात सोमवारी रात्री आपघात घडल्याने सदरच्या आपघातात एक महीला जागीच मृत्यू झाल्याने सदरच्या घटनेने कोलाड आंबेवाडी नाक्यावर एकच खळबळ उडाली आहे. कोलाड पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी अपे रिक्षा आणि मालवाहू आयशर टेम्पो यांच्यात कोलाड आंबेवाडी नाक्यावरील सरकारी दवाखान्यासमोर सदरचे आपघात घडले असून घडलेल्या आपघतात एक महिला जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वरील घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस उपनिरीक्षक अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले तसेच मिळालेल्या माहितीनुसार आपल्या ताब्यातील आयशर टेंपो क्र ए.एच १२ एम ४५३६ हा मुंबई गोवा हायवे रोडने महाड बाजूकडे चालवीत घेवून जात आसताना मौजे आंबेवाडी हददीत सरकारी हॉस्पीटल जवळ  आले वेळी महाड बाजुकडुन मुंबई बाजुकडे येणारी ...
Image
  भाजपाच्या अल्पसंख्याक दक्षिण रायगड अध्यक्षपदी रईस कादरी यांची फेरनिवड   रोहा : प्रमोद गायकवाड :- सामाजिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय सहभाग असलेले, तरुणांसाठी उद्योगाचे मॉडेल ठरलेले सर्व समाज परिचीत प्रसिद्ध उद्योजक, युवा नेतृत्व रईस कादरी यांची भाजपाच्या अल्पसंख्यांक दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. कादरी यांच्या फेरनिवडीने संबंध जिल्ह्यातील कार्यकर्ते मुख्यतः अल्पसंख्यांक समाजाने समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, सर्व अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार, भाजपा सरकारचे धोरण, विकासाची कामे समाजात पोहोचवून संपूर्ण जिल्हा भाजपमय करण्याचा संकल्प आहे, असा निर्धार निवडीनंतर अध्यक्ष रईस कादरी यांनी व्यक्त केला आहे. रोहा येथील युवा उद्योजक रईस कादरी हे अनेक वर्षापासून समाज, राजकारणात सक्रिय आहेत. अल्पसंख्याक समाजाचा सर्वांग विकास साधण्यासाठी देश, राज्य सत्तेतील भाजपात प्रवेश केल्यानंतर रईस कादरी यांनी राजकारणात यशस्वी पाय रोवले. कादरी यांच्या भाजपा पक्ष कार्य वाढीची दखल घेत भाजपच्या अल्पसंख्यांक दक्षिण रायगड अध्यक्ष...
Image
  अलिबागच्या स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंचातर्फे जेष्ठ नागरिकांचा सन्मान अलिबाग : प्रतिनिधी :-  शनिवार दि.७ रोजी येथील स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कलामंचातर्फे सेवानिवृत्त पोलिस उपनिरिक्षक शंकरराव टके, टाऊन प्लॅनिंग खात्याचे माजी अधिकारी, तसेच अलिबाग जेष्ठ नागरिक संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल्ल राऊत आणि रायगड जिल्हा परिषदेच्या माजी कर्मचारी, तसेच अलिबाग जेष्ठ नागरिक संघटनेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा चारुशिला कोरडे या तीन जेष्ठांचा सन्मान शनिवारी (दि.७) प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय अलिबाग येथील राम-नारायण पत्रकार भवनात आयोजित  कार्यक्रमात जेष्ठांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.   याप्रसंगी मंचाचे अध्यक्ष सखाराम पवार, मंचाचे सल्लागार गजेंद्र दळी, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तसेच मंचाचे कार्यवाह नागेश कुळकर्णी,कोमसापचे सहकार्यवाह नंदू तळकर, श्रींरंग घरत, शरद कोरडे, ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, माजी नगरसेवक आर.के. घरत,सार्वजनिक वाचनालय अलिबाग आणि जिल्हा ग्रंथालयाचे कार्यवाह संतोष बोंद्रे ,मंचाचे सल्लागार श्रीरंग घरत, ...
Image
  श्रीवर्धन येथे श्रीमंत पेशवे यांचे  नियोजित स्मारकाचा आराखडा जलदगतीने करा   -महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे   अलिबाग: प्रतिनिधी :- श्रीवर्धन येथील श्रीमंत पेशवे यांच्या नियोजित स्मारकासाठीचा  आराखड्यासाठी सर्व परवानग्या जलदगतीने घेवून हा आराखडा उत्कृष्ट बनवा असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.  मंत्रालय दालन  येथे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे श्रीमंत पेशवे स्मारक आराखडा तयार करण्याबाबत   आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या.यावेळी धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन, मुख्याधिकारी श्रीवर्धन विराज लबडे,नारायण देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रसाद पेंडसे,प्रतिनिधी अविनाश गोगटे,श्रेयस जोशी,लक्ष्मी नारायण देवस्थानचे प्रतिनिधी गजानन करमरकर उपस्थित होते. यावेळी स्मारकाच्या जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व यंत्रणांनी तातडीने मार्ग काढावा अशी सूचना मंत्री अदिती तटकरे यांनी केली. देवस्थान समितीने स्मारकासाठी जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा केली,  तरीही याबाबतीत काही अडचणी असल्यास धर्मादाय आयुक...
Image
  पाली येथील बेकायदा मटका जुगाराकडून पोलीसांना लाखोंचा हफ्ता? अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर रायगड : निलेश महाडीक :- पाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदा मटका जुगार सुरू असून  येथे तीन ठिकाणी बेकायदा मटका जुगाराचे धंदे राजरोसपणे सुरू असल्यामुळे या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे. परंतु येथील पोलीसांना अवैध धंद्यांकडून लाखो रूपयांचा हफ्ता सुरू असल्यामुळे येथील अवैध धंद्यांकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे. हे बेकायदा धंदे तातडीने बंद करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून तसैच महिला वर्गाकडून जोर धरू लागली आहे.  पाली येथील बेकायदा मटका जुगार बंद न झाल्यास महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनी पाली येथील प्रभारी पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. पाली येथील पोलीसांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या बेकायदा मटका जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. पाली येथे १) एसटी बस स्टँड आणि...