पाली येथील बेकायदा मटका जुगाराकडून पोलीसांना लाखोंचा हफ्ता? अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर

रायगड : निलेश महाडीक :- पाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदा मटका जुगार सुरू असून  येथे तीन ठिकाणी बेकायदा मटका जुगाराचे धंदे राजरोसपणे सुरू असल्यामुळे या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे. परंतु येथील पोलीसांना अवैध धंद्यांकडून लाखो रूपयांचा हफ्ता सुरू असल्यामुळे येथील अवैध धंद्यांकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे. हे बेकायदा धंदे तातडीने बंद करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून तसैच महिला वर्गाकडून जोर धरू लागली आहे. 

पाली येथील बेकायदा मटका जुगार बंद न झाल्यास महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनी पाली येथील प्रभारी पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. पाली येथील पोलीसांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या बेकायदा मटका जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. पाली येथे १) एसटी बस स्टँड आणि शिवसेना शाखेच्या बाजूला एका गाळ्यामध्ये, २) पाली बाजारपेठेत बुरूड आळीच्या बाजूला आणि ३) भौराई काँप्लेक्सच्या बाजूला बेकायदा मटका जुगार सुरू असून या मटका जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने हा मटका जुगार बंद करण्याची कारवाई करावी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments

Popular posts from this blog