मुंबई गोवा महामार्गावर कोलाड येथे आपघात प्रवाशी महीला जागीच ठार,दोनजण जखमी रिक्षाची टेम्पोला धडक.
कोलाड (विश्वास निकम,रायगड भुषण) :- मुंबई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावर रिक्षा आणि मालवाहू टेम्पो यांच्यात सोमवारी रात्री आपघात घडल्याने सदरच्या आपघातात एक महीला जागीच मृत्यू झाल्याने सदरच्या घटनेने कोलाड आंबेवाडी नाक्यावर एकच खळबळ उडाली आहे.
कोलाड पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी अपे रिक्षा आणि मालवाहू आयशर टेम्पो यांच्यात कोलाड आंबेवाडी नाक्यावरील सरकारी दवाखान्यासमोर सदरचे आपघात घडले असून घडलेल्या आपघतात एक महिला जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वरील घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस उपनिरीक्षक अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले तसेच मिळालेल्या माहितीनुसार आपल्या ताब्यातील आयशर टेंपो क्र ए.एच १२ एम ४५३६ हा मुंबई गोवा हायवे रोडने महाड बाजूकडे चालवीत घेवून जात आसताना मौजे आंबेवाडी हददीत सरकारी हॉस्पीटल जवळ आले वेळी महाड बाजुकडुन मुंबई बाजुकडे येणारी रियर रीक्षा एम एच ०६ बी व्ही ४६४२ ही वरील चालक आरोपी यांने सदरची रिक्षा अतीवेगाने हाइगाइने बेदकारपणे चालवुन त्याच्या विरुद्ध दिशेला जावून टेम्पोच्या उजवे साइडला मागील बाजुचे गाडला धडकून अपघात झाला सदर अपघाता मध्ये रिक्षा मधील मागे बसलेल्या भागीरथी खार रोहा येथील प्रवाशांपैकी अन्वी किसन गायकर वय वर्षे (२) हीस गंभीर स्वरुपाच्या दुखापती झाल्या व सौ सेजल किसन गायकर वय वर्षे (३१) या महिलेस लहान मोठ्या गंभीर स्वरुपाच्या दुखापती होवून त्यांचे जागीच मृत्यू झाला तसेच किसन गायकर (३२) हे किरकोळ जखमी झाले असून यात दोन्ही वाहनांच्या नुकसान झाले आहे .
तर घडलेल्या घटनेची कोलाड पोलिस ठाण्यात ९६ / २०२३ भादवी सं कलम ३०४, अ २८९,३३७,३३८, मोटर वाहन कायदा १८४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून अधिक तपास मार्गदर्शक व्हीजीट रोहा पोलिस निरीक्षक बाबर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Comments
Post a Comment