अलिबागच्या स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंचातर्फे जेष्ठ नागरिकांचा सन्मान

अलिबाग : प्रतिनिधी :-  शनिवार दि.७ रोजी येथील स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कलामंचातर्फे सेवानिवृत्त पोलिस उपनिरिक्षक शंकरराव टके, टाऊन प्लॅनिंग खात्याचे माजी अधिकारी, तसेच अलिबाग जेष्ठ नागरिक संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल्ल राऊत आणि रायगड जिल्हा परिषदेच्या माजी कर्मचारी, तसेच अलिबाग जेष्ठ नागरिक संघटनेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा चारुशिला कोरडे या तीन जेष्ठांचा सन्मान शनिवारी (दि.७) प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय अलिबाग येथील राम-नारायण पत्रकार भवनात आयोजित  कार्यक्रमात जेष्ठांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

 याप्रसंगी मंचाचे अध्यक्ष सखाराम पवार, मंचाचे सल्लागार गजेंद्र दळी, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तसेच मंचाचे कार्यवाह नागेश कुळकर्णी,कोमसापचे सहकार्यवाह नंदू तळकर, श्रींरंग घरत, शरद कोरडे, ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, माजी नगरसेवक आर.के. घरत,सार्वजनिक वाचनालय अलिबाग आणि जिल्हा ग्रंथालयाचे कार्यवाह संतोष बोंद्रे ,मंचाचे सल्लागार श्रीरंग घरत, माजी नगरसेवक आर.के.घरत, दै.प्रहार जेष्ठ पत्रकार तसेच  रायगड चीप ब्युरो सुभाष म्हात्रे,अँड. राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ पतसंस्थेचे संचालक विजयराज जैन, मंदार कुळकर्णी आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

 सत्कारमूर्तीं पैकी शंकरराव टके आणि प्रफुल्ल राऊत यांच्यासह शरद कोरडे, नागेश कुळकर्णी,संतोष बोंद्रे आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले. सत्कारमूर्ती शंकरराव टके यांचे वय ९१ वर्षांचे असून, ते सातारा जिल्ह्यात शिक्षक असताना त्यांना १९५४ मध्ये त्यावेळी जबरदस्तीने पोलिसात नोकरी करण्यास त्यावेळच्या पोलिसांनी भाग पाडले. त्यानंतर पोलिस हवालदारापासून ते पोलिस निरिक्षकापर्यंत त्यांनी पोलिसात चांगली कामगिरी पार पाडली. अलिबागमधील सेवेनंतर ते मुंबईत असताना सीआयडी, एलसीबी इंटेलिजन्स या खात्यातही त्यांनी आपली चोख सेवा बजावली. त्यानंतर रायगड जिल्ह्यात उरण, म्हसळा, खालापूर, चौक आणि खोपोली येथे पोलिसात सेवा बजाविल्यानंतर त्यांची बदली परत अलिबाग पोलिस ठाण्याच्या कक्षेतील रेवदंडा पोलिस ठाण्यात झाली. त्यावेळी अलिबागच्या कक्षेत रेवदंडा येत होते. कालांतराने रेवदंडा पोलिस ठाणे वेगळे झाले. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणताना त्यावेळी आपला दरारा कायम ठेवला होता.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश कुळकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार नंदु तळकर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog