ज्ञानांकुर  इंग्लिश मेडीयम स्कूल खांबच्या विद्यार्थ्यांचे तालुका स्तरावरील विविध स्पर्धेत सुयश, विविध स्थरावरून अभिनंदन

 कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) :-रोहा तालुक्यातील खांब येथील ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कूल येथील विद्यार्थ्यांनी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव येथे झालेल्या विविध क्रिडा स्पर्धेत यश संपादन केले असुन सर्व यशश्वि विद्यार्थ्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

सानेगाव येथे झालेल्या क्रिडा स्पर्धेत आर्या रविंद्र लोखंडे (उंच उडी प्रथम ),कनिका नितीन कचरे (२०० मिटर धावणे प्रथम)कनिका नितीन कचरे (४०० मिटर धावणे  प्रथम)हर्ष संदिप महाडिक(४०० मिटर धावणे प्रथम)आदेश प्रदीप लाडगे (लांब उडी प्रथम)तसेच मधुरा गणेश कोस्तेकर (थाळी फेक द्वितीय)अक्षरा रविंद्र मरवडे  (१५०० मिटर धावणे द्वितीय)साहिल सचिन गोळे (उंच उडी द्वितीय),श्रुती प्रकाश धनावडे (गोळा फेक तृतीय), आर्या महेश चितळकर (२०० मिटर धावणे तृतीय),वैष्णवी दिपक खराडे (उंच उडी तृतीय),कनिका नितीन कचरे (लांब उडी तृतीय )कर्तव्य सुधीर लोखंडे (थाळी फेक तृतीय), विघ्नेश घनश्याम नाकटे (१०० मिटर धावणे तृतीय), विघ्नेश घनश्याम नाकटे (२०० मिटर धावणे तृतीय) ज्ञानांकुर इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत विजयी ठरले आहेत.

 सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक-संस्थापक /अध्यक्ष रविंद्र लोखंडे, मुख्यध्यापक रिया लोखंडे, क्रिडा शिक्षक विनायक माहित यांचे मोलाचे सहकार्य लाभले

Comments

Popular posts from this blog