भाजपाच्या अल्पसंख्याक दक्षिण रायगड अध्यक्षपदी रईस कादरी यांची फेरनिवड 

रोहा : प्रमोद गायकवाड :- सामाजिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय सहभाग असलेले, तरुणांसाठी उद्योगाचे मॉडेल ठरलेले सर्व समाज परिचीत प्रसिद्ध उद्योजक, युवा नेतृत्व रईस कादरी यांची भाजपाच्या अल्पसंख्यांक दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. कादरी यांच्या फेरनिवडीने संबंध जिल्ह्यातील कार्यकर्ते मुख्यतः अल्पसंख्यांक समाजाने समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, सर्व अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार, भाजपा सरकारचे धोरण, विकासाची कामे समाजात पोहोचवून संपूर्ण जिल्हा भाजपमय करण्याचा संकल्प आहे, असा निर्धार निवडीनंतर अध्यक्ष रईस कादरी यांनी व्यक्त केला आहे.

रोहा येथील युवा उद्योजक रईस कादरी हे अनेक वर्षापासून समाज, राजकारणात सक्रिय आहेत. अल्पसंख्याक समाजाचा सर्वांग विकास साधण्यासाठी देश, राज्य सत्तेतील भाजपात प्रवेश केल्यानंतर रईस कादरी यांनी राजकारणात यशस्वी पाय रोवले. कादरी यांच्या भाजपा पक्ष कार्य वाढीची दखल घेत भाजपच्या अल्पसंख्यांक दक्षिण रायगड अध्यक्षपदाची कादरी यांना जबाबदारी दिली होती. अल्पसंख्यांक समाजातील लोकांशी कादरी यांचा दांडगा संपर्क होता. त्याच संपर्कातून अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या प्रवाहात आणत जिल्ह्यात भाजपाची वर्जमूठ भक्कम केली. याच पक्ष संघटना कार्यातून आता पुन्हा रईस कादरी यांची भाजपाच्या अल्पसंख्यांक दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. कादरी यांच्या पक्ष कार्याची दखल घेत पुन्हा पक्षकार्य करण्याची संधी मिळाल्याचे बोलले जात आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून रईस कादरी यांची ओळख आहे. रईस कादरी यांच्या पक्ष वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची निवड राजकिय क्षेत्रात मानली जात आहे

Comments

Popular posts from this blog