श्रीवर्धन येथे श्रीमंत पेशवे यांचे  नियोजित स्मारकाचा आराखडा जलदगतीने करा  

-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 अलिबाग: प्रतिनिधी :- श्रीवर्धन येथील श्रीमंत पेशवे यांच्या नियोजित स्मारकासाठीचा  आराखड्यासाठी सर्व परवानग्या जलदगतीने घेवून हा आराखडा उत्कृष्ट बनवा असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

 मंत्रालय दालन  येथे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे श्रीमंत पेशवे स्मारक आराखडा तयार करण्याबाबत   आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या.यावेळी धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन, मुख्याधिकारी श्रीवर्धन विराज लबडे,नारायण देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रसाद पेंडसे,प्रतिनिधी अविनाश गोगटे,श्रेयस जोशी,लक्ष्मी नारायण देवस्थानचे प्रतिनिधी गजानन करमरकर उपस्थित होते.

यावेळी स्मारकाच्या जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व यंत्रणांनी तातडीने मार्ग काढावा अशी सूचना मंत्री अदिती तटकरे यांनी केली. देवस्थान समितीने स्मारकासाठी जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा केली,  तरीही याबाबतीत काही अडचणी असल्यास धर्मादाय आयुक्त यांच्याकडून मार्गदर्शन घेवून त्याप्रमाणे कार्यवाही करावी अशा सूचना यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी केल्या.                   

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, नगरविकास, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग  यांनी स्थानिक ठिकाणी आवश्यक त्या परवानग्या विहीत वेळेत घेवून या कामाला गती द्यावी.या ठिकाणी उभारण्यात येणारे स्मारक आपल्या इतिहासाचे साक्षीदार ठरेल असे स्मारक उभारण्यासाठी यामध्ये सर्वांच्या सूचना लक्षात घेवून काम करावे.रायगड जिल्ह्यात येणा-या  पर्यटक, इतिहासप्रेमी  आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे  हे स्मारक होईल अशी अपेक्षाही यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली.                                                         

Comments

Popular posts from this blog