
ग्रामपंचायत वेश्वी तालुका उरण जिल्हा रायगड येथील सरपंच संदीप कातकरी हे तीन अपत्ये असल्याने अपात्र जिल्हाधिकारी रायगड डॉ योगेश म्हसे यांनी दिला ऐतिहासिक निर्णय. उरण(विठ्ठल ममताबादे) :- वेश्वी गावातील सामाजिक कार्यकर्ते व सरपंच पदाचे उमेदवार तक्रारदार गोपाळ पाटील गुरुजी यांनी विद्यमान सरपंच संदीप कातकरी यांना तीन अपत्ये असल्याने ते सरपंच पदासाठी अपात्र असल्या बद्दल निवडणूक प्रक्रिये अंतर्गत जिल्हाधिकारी रायगड यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते. त्या संदर्भात योग्य त्या सूनावण्या घेवून दोन्ही बाजूच्या पक्षकारांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देवून सदरहू केस चा निकाल निर्णयावर ठेवण्यात आला होता. सदर सुनावणी दरम्यान गट विकास अधिकारी उरण यांनी संबंधित ग्रामपंचायत येथे चौकशी करून संदीप कातकरी यांना तीन अपत्ये असल्याचा स्पष्ट रिपोर्ट दिला होता. संदीप कातकरी यांच्या पहिल्या पत्नी यांच्या पासून दोन अपत्ये व दुसऱ्या पत्नी पासून एक अपत्ये अशी एकूण तीन अपत्ये असल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झाले असे त्या अहवालात नमूद केले आहे. पहिली पत्नी ही डाउर नगर तालुका उरण येथील असून दुसरी पत्नी वासा...