महाड दुर्घटनेतील मृतांची ओळख पटविण्याची प्रशासनाची कार्यवाही पूर्ण
महाड : प्रतिनिधी :- महाड एम. आय. डी. पोलीस ठाणे हद्दीतील ब्ल्यूजेट हेल्थ केअर कंपनीमध्ये स्फोट होवून आग लागली होती. या आगीत एकूण 07 व्यक्ती जखमी झालेल्या असून इतर 11 व्यक्ती मयत झाले आहेत. 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे DNA सॅम्पल घेवून मयताची ओळख पटविण्यात आले आहे. व त्यांना अंत्यविधी करिता नातेवाईकांच्या ताबेत देण्यात आले आहे.
मयत इसमांची नावे पुढीलप्रमाणे आहे. 1. अभिमन्यू भीमरांग उराव, रा. बर्नडी, जि.बोकारो, राज्य झारखंड, 2. जीवन कुमार चौबे / ठाकूर, रा. कुमर जगा पंचायत जि.बोकारो, राज्य-झारखंड, 3. विकास बबुल महंतो, रा. बागलमारी जि.पुरलिया, राज्य- पश्चिम बंगाल 4. संजय शिवाजी पवार, रा. खरवली, ता. महाड, 5. अक्षय बाळाराम सुतार, रा. तळीये, ता. महाड, 6. आदित्य मोरे, रा. चोचींदे, ता. महाड, 7. शशीकांत दत्तात्रय भूसाणे, रा. निलंगा, जि. लातूर, 8. सोमनाथ शिवाजी वायदंडे, रा. कोरेगाव जि.सातारा, 9. विशाल रविंद्र कोळी, रा. शिरपूर, जि. धुळे, 10. अस्लम महबूब शेख, रा. बेलावडे, ता. कराड, जि. सातारा, 11. सतीश बापू साळुंके रा. दस्तुरीनका, ता. महाड ही आहेत.
वरील प्रकाराबाबत महाड एम.आय.डी.सी पोलीस गु.र.नं. 123/2023 भा.द. वी. कलम 304, 308, 285, 286, 34 प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ब्लुजेट हेल्थ केअर कंपनी प्रशासनाच्या विरोधात दिनांक 07 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात शैलेश जोशी मेंटेनंस हेड यांना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी महाड विभाग, एस. बी. काळे हे करीत आहेत.
Comments
Post a Comment