महाड शहरात मटका जुगार तेजीत, पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता?

रायगड (निलेश महाडीक) :- महाड शहरामध्ये मटका माफीयांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून येथील पोलीस हे मटका माफीयांचे आधारस्तंभ बनल्यामुळे या अवैध मटका जुगारावर पोलीस कारवाई करीत नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे.

महाड शहरामध्ये बस स्टँड सुकट गल्ली, शिवाजी चौक, मेन बाजारपेठ, नवनगर या परिसरात बेकायदा मटका जुगार आणि 'चिमणी पाखरं' जुगार राजरोसपणे सुरू असून येथे पाटील, शिंदे, पवार, शेडगे आणि चव्हाण या पाच जणांनी हे बेकायदा धंदे सुरू ठेवल्याचे दिसून येत आहे. येथील अवैध मटका जुगाराचे धंदे पाहता महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे यांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याने या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आल्याचे स्पष्ट होत चालले आहे. महाड शहरातील पोलीस सुधरणार कधी? असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झालेला आहे.

येथे मटका जुगार जोमात सुरू असल्यामुळे पोलीसांना सध्या सुगीचे दिवस आल्याचे बोलले जात आहे. येथील बेकायदा मटका जुगारामुळे पोलीसांच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाल्याचे चर्चिले जात असून मटका माफीयांकडून पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्यामुळेच पोलीस या अवैध धंद्यांना साथ देत असल्याचे स्पष्ट होत चालले आहे.

Comments

Popular posts from this blog