डॉक्टर पत्रकार झाला सैराट, महिलेसोबत अश्लील संभाषण करणाऱ्या डॉक्टर पत्रकाराला महिलेच्या कुटूंबियांनी चोपले!
माणगांव (प्रतिनिधी) : डॉक्टर आणि पत्रकार अशी दोन्ही कामे करणारा एका डॉक्टर पत्रकाराला महिलेसोबत अश्लील संभाषण करणे चांगलेच महागात पडले असून आश्लिल संभाषण केल्याप्रकरणी त्या महिलेच्या नातेवाईकांनी या डॉक्टर पत्रकाराला चार भिंतींच्या आड बेदम चोपल्याची खमंग चर्चा माणगांवात रंगताना ऐकायला मिळत आहे.
सध्या माणगांवात स्थित असलेला डॉक्टर पत्रकार याआधी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि आता रायगडमधील माणगांवात वास्तव्य करीत असून वेगवेगळ्या पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले आहे. भेटणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला आपण कधीपासून काम करतोय, कोणकोणते पुरस्कार मिळाले...इतर वरिष्ठ पत्रकारांबाबत बोलताना "...अरे तो काय बातम्या लिहिणार.... माझी बरोबरी करणार... मी रायगडात आल्यापासून साहेबाची अशी वाजवली... शेठ ची अशी जिरवली... माझ्यासोबत काम करा मी शिकवेन कशी लिहायची बातमी ते...." इतकंच काय तर हा पत्रकार पेशाने डॉक्टर सुद्धा आहे!
या डॉक्टर पत्रकाराने पत्रकारितेलाच नाही तर वैद्यकिय क्षेत्रालादेखील कलंक लावलाय... आपल्या दवाखान्यात आलेल्या एका महिलेशी लगट करीत तिच्यासोबत आश्लिल संभाषण केले. यावेळी महिला घाबरली होती तिने यावर काहीही प्रतिक्रीया दिली नाही, परंतु झालेला प्रकार हा आपल्या घरच्यांना सांगितला. त्यामुळे या डॉक्टर पत्रकाराला त्या महिलेच्या नातेवाईकांनी चर्चेकरिता घरी बोलवले व चर्चेदरम्यान त्यांनी दिलेल्या कबुलीनंतर चर्चा सुरु असतानाच नातेवाईकांनी या पत्रकाराला चांगलेच चोपून काढल्याचे बोलले जात आहे. शिवाय या अगोदर रत्नागिरीत सुद्धा याने असाच प्रकार केल्याने त्याला रत्नागिरी सोडावी लागल्याचे उघडकीस आलेले आहे.
या डॉक्टर पत्रकाराला चोप देत असताना... मुझे माफ करो.... ऐसी गलती वापस नही करुंगा... ये बात बाहर मत बोलो.... मेरी बदनामी होगी... पण नाते वाईकांनी मात्र या पत्रकाराचे काहीही एक ऐकले नाही त्याला चार भिंतीच्या आड कानशिलात वाजवत बेदम मार देत घराबाहेर काढल्याचे देखील माणगांव आणि आजूबाजूच्या परिसरात कुजबुज चालू आहे. शिवाय या सर्व प्रकारची म्युट व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे... या महिलेची तसेच नातलगांची बदनामी होऊ नये याकरीताच पोलीस कंप्लेट करण्यात आली नसल्याचे देखील या चर्चेत बोलले जात आहे. परंतु या बदमाश अश्लिल डॉक्टर पत्रकाराला धडा मात्र चांगलाच शिकवल्याची चर्चा अनेक दिवस माणगांवात ऐकायला मिळत आहे.
Comments
Post a Comment