कोलाड येथील भिक्षेकरी वसतीगृहात कोलाड लायन्स क्लबच्या वतीने वस्त्र,पांघरुणाचे वाटप.

गोवे-कोलाड (विश्वास निकम,रायगड भुषण) :- कोलाड विभागात गेली तीन वर्षे अविरतपणे सामाजिक बांधिलकीतून कोलाड लायन्स क्लबच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात असून या अनुषंगाने कोलाड येथिल भिक्षेकरी वसतीगृहात एक नावीन्यपुर्ण उपक्रम राबवत येथील भिक्षेकरी यांना वस्त्र तसेच त्यांना थंडीच्या दिवसात पांघरूनाचे वाटप करण्यात आले.

लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल ३२३१ ए ४ डिस्ट्रिक्टच्या मार्गदरशनाखाली तसेच लायन विजयकुमार गणात्रा यांच्या विशेष सहकार्यातून तसेच कोलाड लायन्स क्लब यांच्या वतीने कोलाड येथील भिक्षेकरी वसतीगृहात वास्तव्यासाठी असलेल्या भिक्षेकरी यांना वस्त्र आणि पांघरून (चादर) यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लब ऑफ इंटनॅशनल ३२३१ ए ४चे डिस्ट्रिक जिल्हा प्रथम उपप्रांतपाल एम जे एफ लायन एन आर परमेश्वर, द्वितीय प्रांतपाल एम जे एफ लायन संजीवजी सुर्यवंशी, डिस्ट्रिक्टचे जी एस टी कॉर्डनेटर एम जे एफ लायन प्रवीण सरनाईक,लायन विजय कुमार गनात्रा,पी एम जे एफ लायन डॉ नमिता मिश्रा, मायक्रो डिस्ट्रिक्ट जी एल टी कॉर्डनेटर एम जे एफ लायन डॉ आलोक मिश्रा,कोलाड क्लबचे मार्गदर्शक लायन रवींद्र घरत,कोलाड लायन्स क्लबचे अध्यक्ष नरेश बिरगावले,संस्थापक अध्यक्ष डॉ सागर सानप, सेक्रेटरी अनिल महाडिक,उपाध्यक्ष डॉ विनोद गांधी, डॉ श्याम भाऊ लोखंडे,बोर्ड ऑफ डायरेक्टर रविंद्र लोखंडे,महेश तुपकर, विट्ठल सावळे, भिक्षेकरी वसतीगृहातील महेश चिपळूणकर,श्री व सौ महाडिक,सह कोलाड लायन्स मेंबर्स उपस्थित होते.

लायन विजय कुमार गणात्रा यांच्या विशेष सहकार्यातून कोलाड येथील भिक्षेकरी वसतीगृहात निवास करत असलेल्या सर्व भिक्षेकरी यांना वस्त्र आणि पांघरून ( चादर) यांचे वाटप करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog