कोलाडात कुणबी समाज एकटवला, समाजासाठी एकोपा निर्माण करण्याचे उद्दीष्ट, बैठकीला उत्स्पुर्त प्रतिसाद.

कोलाड (विश्वास निकम,रायगड भुषण) :- कुणबी समाजाचे प्रलंबित प्रश्न गेली कित्येक वर्षे शासन दरबारी पटलावर रेंगाळत आहेत त्यात जातीनिहाय प्रमापत्रासाठी समाजातील शिक्षण घेत आसलेल्या विद्यार्थ्यांची होते हेळसांड तसेच कुणबी समाज बांधव यांच्यात एकोपा नसल्याने अनेक प्रश्न शासन दरबारी पटलावर रेंगाळत आहेत त्यामुळे येथिल कुणबी समाजाचे जातनिहाय प्रमापत्रासाठी आता एकत्र येऊन एकोपा निर्माण करण्याचे उद्दीष्ट या विभागाने हाती घेतले आहे.

कुणबी समाज कोलाड विभागाची सभा विभागीय आध्यक्ष संदेशजी लोखंडे  यांच्या अध्यक्षतेखाली, उद्योजक राजेशजी कदम यांच्या कार्यालयात कोलाड येथे नुकतीच पार पडली या सभेत सर्व कुणबी समाज बांधव उपस्थित समाजासाठी एकत्रित येऊन एकोपा करण्याचे उद्दीष्ट हाती घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले, तर मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या सभेला कोलाड,खांब, सूतारवाड़ी या भागातील बहुसंख्ये कुणबी समाज बांधव उपस्थित होते,

दिवसेंदिवस रोहा तालुक्यातील कुणबी समाजात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान तसेच जातीनिहाय पडताळणी प्रमाणपत्र वरील शासनाची असलेली १९६७ अट आणी त्यामुळे होत असलेले नुकसान यासाठी कुणबी समाज बांधव एकत्रित येऊन एकोपा निर्माण करण्याचे उद्दीष्ट हाती घेण्याचे आवाहन यावेळी सभेत करण्यात आले असून विविध विषयांवर साधक बाधक चर्चा आणी काही ठराव सर्वानुमते घेण्यात आले.१) राजकीय निवडणुकीच्या वेळी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर  जातीच्या दाखल्याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार करू नये.२) जातीच्या दाखल्याची पडताळणी करण्याची  १९६७ ची अट  शिथिल करण्यासाठी तांत्रिक मोर्चे बांधणी तसेच योग्य भूमिका काय करावी यावर चर्चा करत उपस्थित पदाधिकारी यांनी समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच आपल्या समाजाला आपण कुणबी असुन अपल्याला जातीचे दाखले मिळत नसल्याने शाळेतील विद्यार्थी शिक्षणा पासुन वंचित रहात असुन त्यांना शासकिय विविध योजनांचा लाभ देखील मिळत नसल्याने त्यासाठी आपण समाजाने एकत्र येऊन एकोपा निर्माण करणे ही काळाची गरज आहे असे आवाहन सभेतून विभागीय अध्यक्ष संदेश लोखंडे यांनी सर्व कुणबी समाज बांधवांना एकत्रित येण्यासाठी केले आहे.

Comments

Popular posts from this blog