पाच महिन्यांपासून पोलिस पाटील मानधनापासून वंचित,ऐन दिवाळीत उपासमारीची मारीची वेळ, जनसामान्यांचा सरकार 

कोलाड (विश्वास निकम,रायगड भुषण) :- महाराष्ट्रातील माय बाप राज्य सरकारचे ध्येय धोरणे काय एकीकडे सारेच मंत्री सांगतात की हे सरकार जनतेचे सरकार, जनसामान्य माणसांचा सरकार, हे बोध वाक्य घेऊन चालत असलेले हे सरकार मात्र याच सरकारच्या काळात आज राज्यातील पोलिस पटलांवर ऐन दिवाळीत उपास मारीची वेळ ही बाब चिंतेची असल्याचे बोलले जात आहे.

रोहा तालुक्यात गाव पातळीवर तसेच रोहा,कोलाड, नागोठणे,अशा पोलिस स्टेशन अंतर्गत ९० पोलिस पाटील गाव कारभारी म्हणून गावचे पोलिस पाटील काम पाहतात रायगड जिल्ह्यात गाव पातळीवर गाव कारभारी म्हणून एकूण ९५० पोलीस पाटील कार्यरत आहेत मात्र जून महिन्यापासून आतापर्यंत ५ महिने उलटून गेले तरी त्यांच्या मानधनाचा पत्ता नाही त्यामुळे ऐन दिवाळीत त्यांच्यावरच उपास मारीची वेळ.

पोलिस पटलाना एकूण ६ हजार ५००, रूपये मानधन दिले जात आहे मात्र तो देखील वेळेवर नाही त्यात तब्बल पाच महिने उलटून गेले अद्याप बँक खाते रिकामे दोन दिवसांवर दिवाळी त्यात मानधनाचा पत्ताच नसल्याने ग्रामीण भागातील गाव कारभारी पोलिस पाटलांवर उपास मारीची वेळ सरकारचे ध्येय धोरणे मोठी विकासाचे सरकार सर्व सामान्य जनतेचे सरकार ही केवल पोकळ बोंब अशीच म्हणावे लागेल सर्व सामान्य जनतेच्या सरकार काळातच निम शासकीय कर्मचारी यांचे वेतन अथवा मानधन रखडले ही गोष्ट केविलवाणी आहे.छत्रपती शिवाजी महाराज,शाहू,फुले, आंबेडकर, यांचे राज्यातील सारेच नेतेमंडळी आदराने नामघोष करतात त्यांचे आदर करतात मात्र त्यांच्याच राज्यातील जनतेचे विना मानधनाचे हाळ याकडे कोण बघणार असा प्रश्न उपस्थित गेली पाच महिने गाव पोलिस पाटील मानधना पासुन वंचित राहीले आहेत कायदा आणि सुव्यवस्था म्हणुन साऱ्या गावची जबाबदारी खांद्यावर घेऊन काम करतात मानधन आज येईल उद्या येईल मात्र दिवाळीला नक्की येईल अशी अपेक्षा बाळगणारे पोलिस पाटील मात्र अद्याप उद्या दिवाळीत त्यांच्या हक्काच्या मानधन वेतनापासून वंचितच राहीले तरी संबधीत खात्याने याकडे विशेष लक्ष केंद्रित करून पोलिस पाटील यांचे मानधन मिळाले अशी मागणी केली जात आहे.

प्रतिक्रिया 

रायगड जिल्ह्यात एकूण ९५० तर रोहा तालुक्यात एकूण ९० पोलीस पाटील पद कार्यभार सांभाळत आहेत अनेक त्यात गावात पोलीस पाटील यांच्या जागाही अद्याप रिक्त असल्याने शेजारील गावातील पोलीस पाटील यांच्यावर हा अतिरिक्त भार तुटपुंज्या मानधनावर कार्यभार सांभाळत आहेत त्यात गेली पाच महिने आम्हा पोलिस पाटील यांना मानधन वेतन मिळाला नाही उद्या दिवाळी सण असल्याने वंचित राहिलो आहोत त्यामुळे शासनाने सहानभूतीपूर्वक विचार करून येत्या एक दिवसात मानधन वेतन अदा करावे अशी मागणी केली जात आहे.

सुनील कासार,आध्यक्ष 

रोहा तालुका पोलीस पाटील संघटना.

Comments

Popular posts from this blog