सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थाच्या सदस्यांच्या पोलिस अधीक्षक तर्फे
कोलाड (विश्वास निकम,रायगड भूषण):- सामाजिक कार्यात प्रशासनाला मदत lकरणाऱ्या सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगड यांचा सन्मान रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे उपअधीक्षक अतुल झेंडे व सर्व पदाधिकारी यांच्या शुभेहस्ते सन्मानचिन्ह व २५ ०००/रुपये रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
एप्रिल सन २०२३ महाड बोर घाटात झालेली बस दुर्घटना, मौजे इर्शालवाडी येथे जुलै २०२३मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेली नेसर्गिक आपत्ती, तसेच महाड एम. आय. डी.सी. येथील कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात अत्यंत धाडसाने व साहसीवृतीने बचावकार्य करुन प्रशासनाला मद्दत केल्याबद्दल सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगड च्या सर्व सदस्यांचा सन्मान बुधवार दि.८/११/२०२३रोजी रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे आणि संस्थेचे सर्व पधा धिकारी यांच्या शुभेहस्ते सन्मान चिन्ह व रोख रक्कम २५०००/-देऊन गौरवविण्यात आले.
यावेळी या संस्थेचे पदाधिकारी व सदस्य सागर दहिंबेकर, निलेश लोखंडे, प्रयाग बामुगडे, सुरज दहिंबेकर, श्वेता विश्वकर्मा, ओंकार महाडिक, पुरुषोत्तम देवरुखकर, प्रणय सागवेकर, पुरुषोत्तम मासुक, विशाल जाधव यांचा सन्मान करण्यात आला.
Comments
Post a Comment