Posts

Showing posts from December, 2023
Image
 झी मराठी निर्मित "जाऊबाई गावात" टिमकडून खोपटे गावात  महिलांच्या  खेळांना लाभला उदंड प्रतिसाद उरण (विठ्ठल ममताबादे) :-  खोपटे गावच्या माजी सरपंच भावना कैलास म्हात्रे  यांनी  खोपटे गावातील महिलांकरीता  झी मराठी निर्मित "जाऊबाई गावात" या कार्यक्रमाच्या टिम कडून गंमतीशीर खेळांचे आयोजन करण्यात आले. या खेळामध्ये खोपटे गावातील महिलांनी  मोठ्या संख्येने  उपस्थित  राहुन सहभाग घेतला. महिलांसाठी विविध प्रकारचे खेळ जसे की,  कांदा फोडणे, लसूण सोलणे, तांदुळातुन खडे निवडणे, खोबरे किसणे, उस तोंडाने सोलणे इत्यादी मजेशीर खेळ झी टीव्ही निर्मित "जाऊबाई गावात" चे प्रतिनिधी रवि प्रधान व त्यांचे सहकारी प्रथम दाभोळकर यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात जमलेल्या महिलांकडून खेळ घेऊन उत्साहाने खेळांत रंगत आणली. महिलांसाठी त्यांच्या रोजनिशीतील कामांचे रूपांतर खेळात झाले आणि खेळ रंगतदार होत गेले. खेळात प्रथम आलेल्या महिलांना "जाऊबाई गावात" च्या टिम कडून पारितोषिकही देण्यात आले. उपस्थित महिलांकरीता  भावना कैलास म्हात्रे यांच्या सौजन्याने  लकी ड्रॉ काढ...
Image
  जासई विद्यालयात वाढदिवसानिमित्त मधुकर पाटील यांच्या कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप उरण (विठ्ठल ममताबादे):-  रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज,दहागाव विभाग, जासई. ता. उरण जि.रायगड. या विद्यालयात आपल्या ५९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कामगार नेते मधुकर पाटील( जे.एन.पी.ए.) यांच्याकडून सामाजिक जाणिवेतून गोर-गरीब व गरजू विद्यार्थ्यांना  दप्तरे, गणवेष, वही-पेन, शूज इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष,भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री,कामगार नेते सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा अभ्यासासाठी चांगला वापर करावा असे मनोगत व्यक्त केले.वाढदिवस मूर्ती मधुकर पाटील यांना वाढदिवसाच्या  शुभेच्छा देऊन त्यांच्या विषयी त्यांच्या या सामाजिक कार्या बद्दल  सुरेश पाटील यांनी गौरवोदगार काढले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दशरथ भगत,सुधीर घर यांची विशेष उपस्थि...
Image
  रायगड जिल्हा कलाध्यापक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर उरण (विठ्ठल ममताबादे) :-  राज्य कलाध्यापक संघ महामंडळ संलग्न रायगड जिल्हा कलाध्यापक संघाची नूतन कार्यकारणी राज्य महिला अध्यक्ष श्रीमती प्रियवंदा तांबोटकर, विभागीय उपाध्यक्ष मुबंई विलास सेसाणे  व ज्येष्ठ मार्गदर्शक बी. यू.महाजन  यांच्या सहकार्याने तीन वर्षासाठी जाहीर करण्यात आली. या रायगड जिल्हा कलाध्यापक संघातील कार्यकारिणी पुढील प्रमाणे -  जिल्हा अध्यक्ष अविनाश बाळकृष्ण कदम -उरण,  जिल्हा सचिव आदेश कृष्णा सुतार -माणगाव उपाध्यक्ष- संदीप दामोदर पारंगे - अलिबाग, उपाध्यक्ष सत्यजित पांडुरंग डांगे - माणगाव उपाध्यक्ष -रमेश पुंडलिक खुटारकर -उरण  उपाध्यक्ष- संजय एकनाथ पवार- पनवेल सहसचिव  महेश पोपेटा -पनवेल कोषाध्यक्ष- सुभाष काशिराम जाधव -महाड जिल्हा महिला आघाडी - मनीषा चंद्रकांत पाटील- पनवेल सल्लागार - बी.यू. महाजन -पनवेल,  दिलीप तुकाराम चांढवेकर -दासगाव प्रशांत सदाशिव निकम- महाड  श्रीम. प्रियवंदा तांबोटकर -उरण, अनिल बाबुराव पालकर - महाड, प्रसिद्ध प्रमुख- राजेंद्र तुकाराम पोवार- माणगाव तालुक...
Image
  मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लेक लाडकी योजना लाभदायी    मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवा रायगड : प्रतिनिधी :- मुलींचा जन्मदर वाढविणे तसेच मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारी लेक लाडकी  योजना मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लाभदायी असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे. माझी कन्या भाग्यश्री ही योजना 2017 पासून राबविण्यात येत होती. या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर 50 हजार रुपये तसेच दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर दोन्ही मुलींच्या नावावर प्रत्येकी 25 हजार रुपये ठेवण्यात येत होते. रायगड जिल्ह्यात या योजनेंतर्गत 487 मुलींना लाभ देण्यात आला आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-  लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाखपेक्षा जास्त नसावे), रेशनकार्ड (पिवळे किंवा केशरी), लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील), पालकांचे ...
Image
  लेकरासाठी प्राण प्रणाला लावणारी फक्त आई असते :- ह. भ. प. बबन महाराज वांजळे कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण) :- छत्रपती शिवाजी महाराज यांना हिरोजी इंदुलकर यांनी सांगितले होते की ४४०० फूट उंचीचा गड आहे या गडावरून खाली जाईल ते पाणी वर येईल ती हवा यामुळे तुमच्या शेजारी कोणी ही येऊ शकणार नाही. परंतु गडाचे दरवाजे बंद झाल्यावर लेकरासाठी मृत्यूला आमंत्रण देत ती  माऊली गडावरून खाली उतरली व लेकराला स्तनाशी धरून दुध पाजले तेव्हा त्या आईचे मन शांत झाले.त्यावेळी तीला पालखीतून गडावर आणले तेव्हा  शिवाजी महाराज यांनी हिरोजी इंदुलकर यांना सांगितले की तुम्हीतर म्हणाले की या गडावरून कोणी येऊ शकत नाही यावर हिरोजी इंदुलकर यांनी उत्तर दिले की ती महाराष्ट्राची आई  आहे.असे मत मातेचिये चित्ती l अवधी बाळाकाची व्याप्ती ll देह विसरे आपुला l जवळी घेता सिण गेला ll दावी प्रेम भाते l आणि अंगावरी चढते ll तुका संतापुढे l पायी झोंबे लोंड कोंडे ll या जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे हभप बबन महाराज वांजळे यांनी गोवे येथील कुणबी समाज नेते  रामचंद्र सटू जाधव यांच्या ७५ व्या अभिष्टचि...
Image
  विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून वंचित घटकांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन नांदेड : प्रतिनिधी :- केंद्र शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून  कृषी पर्यत विविध योजनाचा समावेश आहे. 11 डिसेंबर रोजी या गावात विकसित भारत संकल्प यात्रा विकसित भारत संकल्प यात्रा उद्या 11 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लोणी खु., नांदेड तालुक्यातील नाळेश्वर, राहाटी, भोकर तालुक्यातील धानोरा, नारवट, बिलोली तालुक्यातील अटकळी, हुनगुंदा, देगलूर तालुक्यातील तुंबरपल्ली, शिळवणी तर कंधार तालुक्यातील गोगदरी, चिंचोली व किनवट तालुक्यातील मारेगाव बु. मोहपूर, लोहा तालुक्यातील हळदव, माहूर तालुक्यातील तुळशी, लसनवाडी, मुखेड तालुक्यातील अंबुलगा, लोणाळ, नायगाव तालुक्यातील अंचोली, नरंगल तर उमरी तालुक्यातील चिंचाळा येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील...
Image
  जासई रांजणपाडा गावात घरफोडी. एकाच रात्री चार घरातील मौल्यवान दागिने आणि रोक रक्कम घेऊन चोरटे पसार. उरण(विठ्ठल ममताबादे):- उरण तालुक्यातील जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रांजणपाडा गावातील बंद घरातील दरवाजांच्या कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी एकाच रात्रीत चार घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.रविवारी ( दि१०) रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी रांजणपाडा गावात धुमाकूळ घातल्याने रहिवाशी भिंतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रांजणपाडा गावातील श्रीमती आहिल्याबाई महादेव म्हात्रे हि महिला आपले घर बंद करून बाजूच्या घरात नेहमी प्रमाणे झोपायला गेली होती.तर प्रभाकर तुकाराम पाटील हे रात्र पाळीसाठी कामावर गेले होते,तसेच नामदेव आलू घरत, सुहास म्हात्रे हे रहिवाशी रविवारी ( दि१०) आप आपल्या घरी रात्रीच्या सुमारास घरी झोपी गेले होते.याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेऊन एकाच रात्री चार बंद घरातील दरवाजांच्या कडी कोयंडा कटरणी तोडून घरात प्रवेश केला.आणि कपाटाचे लाँक तोडून कपाटातील सोन्...
Image
  विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पोहोचले शासन आपल्या दारी विकसित भारत संकल्प यात्रेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांशी साधला दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद हिंगोली : प्रतिनिधी :-   'विकसित भारत संकल्प यात्रा' आज हिंगोली तालुक्यातील आडगाव व राहोली बु., कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी व वारंगा मसाई, औंढा तालुक्यातील पिंपळदरी व जामगव्हाण, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव व केंद्रा बु. , वसमत तालुक्यातील पारडी खु. व कोनासा येथे पोहचली आहे. शासनाच्या वतीने सर्व प्रकारच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी, कामगार, महिला तसेच युवा वर्गाच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना शासन राबवत आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी पोहोचले आहे.  यावेळी या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, ओडीएफ प्लस मॉडेल ग्रामपंचायत, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती क...
Image
  रितेश निवाते यांची युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी फेरनिवड तळा : नजीर पठाण :- रितेश निवाते यांची युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली. तसेच श्री गोविंद कासार यांची संघटन सरचिटणीस म्हणून फेरनिवड करण्यात आली तसेच युवराज मुंढे यांची तालुका सरचिटणीस म्हणून फेर निवड करण्यात आली तसेच  श्री.कौस्तुभ वझे यांची तालुका सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली. सौ.अश्विनी कडू यांची महिला मोर्चा तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली व भारती शेट यांची महिला शहर अध्यक्ष माणगाव म्हणून फेरनिवड करण्यात आली,तसेच नितीन दसवते यांची देखील माणगाव शहर अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली. या निवडीबद्दल सर्व पदाधिकारी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
Image
  प्राथमिक आरोग्य केंद्र,  शाळा, अंगणवाडी येथे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट, समस्या सोडविण्याचे आश्वासन तळा : नजीर पठाण :- नवनिर्वाचित सरपंच सौ. लता उमेश करंजे, उपसरपंच श्री अनंत लोखंडे, सदस्य - गितीशा दांडेकर, सदस्य - किशोरी करंजे , सदस्य - वसीम बाणकोटकर, माजी पोलीस पाटील - विठ्ठल देवकर, माजी अध्यक्ष कृष्णा मालुसरे, अध्यक्ष सुरेश करंजे, उमेश करंजे, क्लार्क विजय शीलकर यांनी दिनांक ०४ डिसेंबर २०२३ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मांदाड, आदर्श माध्यमिक विद्यामंदिर मांदाड, रा.जि.प शाळा मांदाड, अंगणवाडी मांदाड,, उर्दू शाळा मांदाड, रा.जि.प. शाळा कुडे या शासकीय वास्तूंना भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या आपल्या समस्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन असे सरपंच सौ. लता उमेश करंजे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी उपस्थित गुरुजन वर्ग आणि कर्मचारी यांना सांगितले. आम्ही येथे सर्विस करत असतानाच्या कालावधीत आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी ग्रामपंचायत कडून असा कधी प्रयत्न झाला नाही. परंतु आपण खुर्चीवर बसुन 15 दिवस झाले अणि एवढ्या जलद गतीने आमची भेट घेण्यासाठी आलात यात ...
Image
  इंदापूरमध्ये घरफोडी, तीन लाखांचा ऐवज लंपास माणगाव : सज्जाद डावरे :-  माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ३ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.  दि. ५ डिसेंबर रोजी १ ते १.२० वा. च्या दरम्यान कलानगर, इंदापूर येथील फिर्यादी अंकिता अरुण मांगले यांच्या राहत्या घरात दोन अनोळखी इसमांनी दारावर धक्का मारुन उघडून आत प्रवेश केला. त्यापैकी एक आरोपी तोंडाला पूर्ण कपड्याने झाकलेला व डोळे उघडे ठेवलेला मजबूत बांधा असलेला तसेच दूसरा सढपातळ व साधारण उंचीचा होता. त्यातील एकाने फिर्यादी यांचे अंगावर बसून त्यांचे तोंड दाबून त्यांना तु चुप बैठ असे हिंदीमध्ये बोलून धरून ठेवले. दुसऱ्या आरोपीने कपाट उघडून सोबत आणलेल्या हत्याराने लॉकर तोडून ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन, फिर्यादी यांना त्यांचे घरात डांबून दोघे पळून गेले.  याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३५५/२०२३, भा.दं.वि. कलम ३९४, ३४२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आस्वर करीत...
Image
  आमृतनाथ स्वामी श्री क्षेत्र दत्तमंदिर पुगांव ते आळंदी देवाची पायी दिंडीचे प्रस्तान कोलाड (विश्वास निकम,रायगड भुषण) :-  श्रीमत सद्गुरू पद्मनाभाचार्य स्वामी शिष्य संप्रदाय अमृतनाथ स्वामी श्री. क्षेत्र दत्तमंदिर पुगांव ते आळंदी देवाची पायी दिंडी सोहळ्याचे मिती कार्तिक वद्यपंचमी शुक्रवार दि १/१२/२०२३ रोजी दिंडीचे प्रस्तान झाले आहे.  या दिंडीची कोलाड हिल सोसायटी मध्ये आगमनाने सुरवात केली. असुन दरवर्षी प्रमाणे रविंद्र तारू यांनी या पालखीचे स्वागत केले व रविंद्र तारू व त्यांची पत्नी छाया तारू यांनी यांच्या हस्ते तुळशी पूजन केले.तसेच कोलाड हिल सोसायटीचे सेक्रेटरी संतोष मोरे, उपखजिनदार शैलेश यादव,रुपेश गोरिवले,प्रकाश साळवी,प्रभाकर मोरे, लाड काका, प्रणय लाड, विवेक कोळी, भास्कर मोरे,संतोष जाधव,तसेच सोसायटीचे असंख्य महिला वर्ग व सर्व सदस्य यांनी दिंडीचे स्वागत केले.   तसेच श्रीमंत सद्गुरू पद्मनामाचार्य स्वामी शिष्य सांप्रदयाच्या वतीने श्री नारायण धनवी यांनी रविंद्र तारू व छाया तारू यांचे श्रीफळ देऊन स्वागत केले. व नंतर पुढील मार्गासाठी दिंडीचे प्रस्थान झाले.
Image
     श्रीराम मंदिरासाठी सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सवाच्या आयोजनासह 7 ठराव एकमताने संमत! महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांत होणार ‘जिल्हास्तरीय मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’! कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- श्री क्षेत्र ओझर येथे 2 आणि 3 डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या समारोपप्रसंगी ‘राज्यस्तरीय मंदिर महासंघा’ची घोषणा करण्यात आली. यात प्रामुख्याने राज्यातील 264 मंदिरांमध्ये वस्रसंहिता लागू करणे आणि 16 जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हास्तरीय मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’ घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रसंगी सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे सरकारमुक्त करून महाराष्ट्र सरकारने भक्तांच्या स्वाधीन करावीत, मंदिरातील संपत्ती विकासकामांसाठी वापरण्यात येऊ नये, महाराष्ट्रातील पौराणिक आणि ऐतिहासिक मंदिरांना अर्थसाहाय्य करून त्यांचा जीर्णोद्धार करावा, लेण्याद्री श्री गणेश मंदिरात येणार्‍या दर्शनार्थींना केंद्रीय पुरातत्व खात्याकडून आकारला जाणारा निधी आकारण्यात येऊ नये, तीर्थक्षेत्रे, गड-किल्ले यांवरील अतिक्रमणे सरकारने तात्काळ हटवावीत, तीर्थक्षेत्रे आणि अन्य मंदिरे यां...
Image
  उरण मध्ये जागतिक दिव्यांग दिन विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा. आमदारकीचा मानधन व पेन्शन दिव्यांगांसाठी वाटप करणारे माजी आमदार  मनोहरशेठ भोईर हे 'अपंग मित्र' पुरस्काराने सन्मानित. उरण(विठ्ठल ममताबादे) :- ३ डिसेंबर २०२३ म्हणजे जागतिक दिव्यांग दिन, संपूर्ण जगामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून जागतिक अपंग दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने दिव्यांग सामाजिक संस्था  उरण यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन हा सोहळा जेएनपीटी मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून माजी आमदार मनोहरशेठ भोईर हे उपस्थित होते.तसेच आपला आमदारकीचे मानधन व पेन्शन दिव्यांगांसाठी वाटप करणारे माजी आमदार मनोहरशेठ भोईर त्याचप्रमाणे अरविंद घरत,संदिप म्हात्रे,भावनाताई घाणेकर विशाल पाटेकर आणि उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, जेएनपीटीचे माजी विश्वस्त काॅ. भूषण पाटील, सरचिटणीस  संतोष पवार यांना आयोजक दिव्यांग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र म्हात्रे, आणि योगेश पाटील , समिर ठाकूर , राजेंद्र पाटील, संदेश राजगूरु यांच्या वतीने शेकडो अपंगांच्या उपस्थितीत अपंग मित्...
Image
  विंधणे (खालचा पाडा) रक्तदान शिबिरात ४७ रक्तदात्यांनी केले रक्तदान. उरण (विठ्ठल ममताबादे) :- सामाजिक कार्यकर्ते तथा साईभक्त धनराज पाटील यांनी राज्यातील थॅलेसेमिया रुग्णांची रक्ताची अडचण दूर करण्याच्या उद्देशाने सामाजिक बांधिलकी म्हणून आयोजित केलेल्या रक्तदाब  शिबिरात ४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या शिबिराचे उदघाटन  स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनोद सदाशिव साबळे यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी ज्वालासिंह देशमुख स्वराज्य संघटना करंजाडे,अतिष साबळे ग्रामपंचायत सदस्य, कुणाल जाधव, नितीन ओंबळे, गणेश पोशा कोळी, भगवान म्हात्रे, विंधणे खालचा पाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष कृष्णा कोळी, जयराम पाटील,केतन पाटील, विनोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आपल्या मनोगतातून बोलताना विनोद साबळे म्हणाले की, विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी विज्ञान रक्ताची निर्मिती अजून करू शकले नाही, त्यामुळे धनराज पाटील चा आदर्श घेऊन सर्व तरुणांनी रक्तदान करण्यास पुढे यावे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनराज पाटील, निवास पाटील सुनिल वर्तक, सुनील पाटील,अमित पाटील,अनुज पाटील,यश पाटील, ...
Image
  पीक नुकसानीचे संवेदनशीलपणे पंचनामे करा           पालकमंत्री संजय राठोड  अवकाळी पावसाच्या नुकसानीचा आढावा  वाशिम : प्रतिनिधी :- जिल्हयात २६ ते २९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ज्या पिकांचे नुकसान झाले आहे,त्या पिकांच्या नुकसानीचे संवेदनशीलपणे पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. २ डिसेंबर रोजी जिल्हा नियोजन समितीच्या परिषद कक्षात अवकाळी पावसाच्या नुकसानीचा आढावा घेताना पालकमंत्री श्री.राठोड बोलत होते.यावेळी आमदार ऍड. किरणराव सरनाईक,आमदार धीरज लिंगाडे, आमदार राजेंद्र पाटणी,जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,पोलीस अधीक्षक अनुज तारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा,आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे,उपविभागीय अधिकारी (वाशिम) वैशाली देवकर, सखाराम मुळे (मंगरूळपीर),ललित वऱ्हाडे ( कारंजा) व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.  पालकमंत्री श्री.राठोड पुढे म्हणाले, जिल्ह्यात अवकाळी पावसामु...
Image
  सायन रुग्णालयात लवकरच १२०० खाटा उपलब्ध होणार सोनोग्राफी, डायलिसीसची सुविधा वाढविणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सायन रुग्णालयाला भेट; रुग्णांची विचारपूस अन् दिलासाही. मुंबई : प्रतिनिधी : -  तुम्हाला रुग्णालयात औषधे मिळतात का..बाहेरून आणावी लागत नाही ना..ट्रीटमेंट कशी सुरू आहे..वेळेवर जेवण मिळते ना..सायन हॉस्पीटलमधील रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधलेला हा संवाद..आज महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ट्रॉमा आयसीयु, सर्वसाधारण वॉर्ड, वॉर्ड क्रमांक चार येथे पाहणी करताना रुग्णांची विचारपूस केली आणि दिलासा दिला. यावेळी त्यांनी अचानक रुग्णालयाच्या स्वयंपाक गृहाला भेट देऊन तेथील अन्नपदार्थांची पाहणी केली.  सायन हॉस्पीटलमध्ये २०० खाटांचा अतिदक्षता विभाग आणि एक हजार खाटांचा सर्वसाधारण कक्षाचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल त्यामुळे नव्याने १२०० खाटा उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. मुंबईच्या सखोल स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या...
Image
  श्रीवर्धन तालुक्यातील विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते लोकार्पण कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार  रायगड : प्रतिनिधी : - श्रीवर्धन तालुक्यातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर, अंतर्गत श्रीवर्धन शहर पाणीपुरवठा योजना आणि प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत श्रीवर्धन बीच सुशोभिकरण कामांचे  लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन कटीबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी यावेळी दिली. या लोकार्पण सोहळ्यास महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे,खासदार सुनील तटकरे,आमदार अनिकेत तटकरे,मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टे वाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे,मुख्याधिकारी विराज लबडे,प्रांतधिकारी डॉ.दीपा भोसले,तहसीलदार महेंद्र वाकलेकर आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या शेतकऱ्यांना सोयाबीन साठी, कांद्यासाठी, टोमॅट...
Image
  मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी  प्रशासनास सहकार्य करावे- विभागीय आयुक्त सौरभ राव सोलापूर : प्रतिनिधी : - भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नव मतदारांची नोंदणी करण्यासह मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले. दिनांक १ जानेवारी २०२४ या  अहर्ता दिनांकावर  आधारित पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्त पुनम मेहता, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,उपजिल्हा निवडणूक  अधिकारी गणेश निराळे, प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव, सदाशिव पडदुणे, बी.आर माळी, विठ्ठल उदमले, नामदेव टिळेकर, प्रियंका आंबेकर तसेच भारतीय जनता पार्टीचे अनिल कंदलगी ,कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडीया  ॲड. अनिल वासम , इंडीयन नॅशनल काँग्रेस पार्टीचे ॲड .मनिष गडदे  इतर र...
Image
  नविन शेवा येथे आगरी कोळी द्रोणागिरी महोत्सव २०२३ चे आयोजन उरण (विठ्ठल ममताबादे) :- शांतेश्वरी आई सामाजिक संस्था उरण नवीन शेवा तर्फे २ डिसेंबर ते  १० डिसेंबर २०२३ दरम्यान सांयकाळी ६:३० ते रात्री १० पर्यंत शांतेश्वरी मैदान, शिवराय चौक,नवीन शेवा,द्रोणागिरी, उरण येथे आगरी कोळी द्रोणागिरी महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. आई शांतेश्वरी सामाजिक संस्था उरण नविन शेवा तर्फे हे महोत्सव पहिल्यांदाच साजरे केले जात आहे. शनिवार दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी सांयकाळी ६:३० वाजता मंगळागौरी व पारंपारिक पारंपारिक फेर नृत्य स्पर्धा, रविवार दि ३ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्टेप आर्ट निर्मित दिव्या कदम प्रस्तूत श्रृंगार रस लावण्यांचा,सोमवार दि. ४ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६:३० वा महाराष्ट्राची लोक‌धारा, मंगळवार ५ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६:३०वा. स्टेप आर्ट निर्मित नृत्य आणि हास्याचा नजराणा - जल्लोष सुवर्ण युगाचा, बुधवार दि ६ डिसेंबर २०२३ रोजी सायंका ६:३० वा. कराओके गायन आणि नृत्य,गुरुवार दि ७ डिसेंबर २०२३ रोजी सायं ६:३० वा. एकेरी नृत्य नृत्य स्पर्धा, शुक्रवार ८ डिसेंबर २०२३ रोजी संध्य...
Image
  महामंडळच्या बसेस पागोटे गावाजवळून धावणार पागोटे ग्रामपंचायतच्या पाठपुराव्याला यश. उरण(विठ्ठल ममताबादे) :- उरण आगारातील बस हे पागोटे गावाजवळून सोडण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत पागोटे मार्फत दि १५/३/२०२३ रोजी पत्रव्यवहार करून करण्यात आली होती.यासाठी पागोटे ग्रामपंचायतने विशेष पुढाकार घेतला. पागोटे ग्रामपंचायतच्या मागणीला आता यश प्राप्त झाले असून काही दिवसातच उरण महामंडळच्या बसेस पागोटे गावाजवळून जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशी वर्गांना यामुळे खूप मोठा दिलासा मिळणार आहे. मौजे पागोटे गावासाठी महामंडळ उरण आगारातर्फे बस सेवा चालू केली होती परंतु काही कारणास्तव ती पाच ते सहा वर्षापूर्वीच बंद करण्यात आली आहे. पागोटे कुंडेगाव नवघर या गावातील शाळकरी विद्यार्थी पुढील शिक्षणाकरिता फुंडे हायस्कूल व इतर शाळेमध्ये जात असून त्यांना बससेवेचा उपयोग होत होता. सदर शाळेचे अंतर चार ते पाच किलोमीटर असल्याने त्यांना चालत प्रवास करावा लागत आहे. गावाशेजारी मोठमोठाले कंटेनर यार्ड वसल्याने कंटेनर वाहनांची वर्दळ जास्त असून पायी प्रवास करणारे विद्यार्थी, ग्रामस्थ व नोकरी निमित्त इतर ठिकाणी जाणारा नोकर वर्ग या...
Image
  ३ डिसेंबर रोजी मा. आमदार अवधूतदादा तटकरे यांचा वाढदिवस सोहळा  रोहा : प्रमोद गायकवाड :- युवकांचे आधारस्तंभ मा. आमदार अवधुतदादा तटकरे साहेब यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा रविवार दि.०३ डिसेंबर २०२३ रोजी आहे. तरी यासाठी मा. अवधूतदादा हे शुभेच्छा स्विकारण्यासाठी रोहा येथील निवासस्थानी सकाळी १०:०० ते २:०० या वेळेत उपस्थित राहणार आहेत, तरी सर्व कार्यकर्ते हितचिंतकांनी उपस्थिती रहावे. या कार्यक्रमाचे आयोजन मा. आमदार अवधुतदादा तटकरे मित्र मंडळ रोहा यांनी केले आहे, अशी माहिती अवधूतदादा समर्थक श्री प्रसाद खुळे यांनी दिली.
Image
  धूतूम ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे सुरु असलेल्या आमरण उपोषणाला आले यश. मागण्या मान्य झाल्याने उपोषणाची यशस्वी सांगता. उरण(विठ्ठल ममताबादे) :- उरण तालुक्यातील धूतुम ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या इंडीयन ऑईल टँकिंग अर्थात इंडीयन ऑईल अदानी व्हेंचर्स या कंपनीत गेल्या २५ वर्षात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सामावून न घेता सतत परप्रांतियांना नोकरीत स्थान दिल्याने स्थानिक भूमिपुत्र अजूनही बेरोजगार राहिला होता .अनेकवेळा पत्रव्यवहार करून देखील कंपनी प्रशासन दाद देत नव्हती. त्यामुळे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला. सदर कंपनी प्रशासनाने स्थानिक तरुणांना तत्काळ रोजगार द्यावा या प्रमुख मागणीसाठी कंपनी विरोधात २० नोव्हेंबर पासून धुतुम ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे आमरण उपोषण सुरु झाले होते.बेरोजगारांच्या समस्यावर कंपनी प्रशासन, पोलीस प्रशासन व उपोषण कर्ते यांच्यात ३ वेळा बैठकी झाल्या मात्र त्या असफल ठरल्या.दि २८ नोव्हेंबर २०२३ रोजी आंदोलनाचा नववा दिवस होता.उपोषण कर्त्यांनी आमरण अधिक तीव्र केल्याने कंपनी प्रशासनाला उपोषण कर्त्यांपुढे नमते ...
Image
  बेकायदेशीररित्या शस्त्र जवळ बाळगल्याने न्हावा शेवा पोलीस ठाणे मार्फत आरोपीस अटक. उरण(विठ्ठल ममताबादे):-  दि. २७/११/२०२३ रोजी पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराने एक इसम विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूलसह पनवेल तालुक्यातील मौजे गव्हाण गावाचे स्मशानभुमीचे परिसरात फिरत असल्याची खात्रीलायक माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे यांनी ताबडतोब सदरील माहिती न्हावा शेवा बंदर विभाग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांना दिल्यावर त्यांचे सुचनेवरून पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे, पोलीस हवालदार महेंद्रसिंग राजपूत, पोलीस हवालदार शिवाजी बसरे, पोलीस हवालदार संजय सपकाळ व पोलीस नाईक विशाल हिंदोळा यांचे विशेष पथक तयार करून सदरील बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगणा-या इसमाचा शोध घेवून त्याचेवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सापळा लावला व सदर इसमास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेस डावे बाजूस पॅन्टचे आतमध्ये एक देशी बनावटीचे पिस्तूल मिळून आले.  सदरचे पिस्तूल बेकायदेशीर पणे त्याने जवळ बाळगले म्हणून त्याचेवर न्हावाशेवा पोलीस ठाणेत गु...