विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पोहोचले शासन आपल्या दारी

विकसित भारत संकल्प यात्रेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांशी साधला दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद

हिंगोली : प्रतिनिधी :-  'विकसित भारत संकल्प यात्रा' आज हिंगोली तालुक्यातील आडगाव व राहोली बु., कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी व वारंगा मसाई, औंढा तालुक्यातील पिंपळदरी व जामगव्हाण, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव व केंद्रा बु. , वसमत तालुक्यातील पारडी खु. व कोनासा येथे पोहचली आहे. शासनाच्या वतीने सर्व प्रकारच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी, कामगार, महिला तसेच युवा वर्गाच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना शासन राबवत आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी पोहोचले आहे. 

यावेळी या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, ओडीएफ प्लस मॉडेल ग्रामपंचायत, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के, मेरी कहानी मेरी जुबानी आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. तसेच 'आपला संकल्प, विकसित भारत' या एलईडी रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनाही सांगण्यात आल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील गावागावात फिरणाऱ्या संकल्प यात्रेच्या रथाद्वारे नागरिकाशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. 

हिंगोली तालुक्यातील आडगाव येथील कार्यक्रमाला आमदार तानाजी मुटकुळे, रामदास पाटील सुमठाणकर, भाऊराव देशमुख, फुलाजी शिंदे, बाबाराव बांगर, के. के. शिंदे, नारायणराव खेडकर, तहसीलदार नवनाथ वगवाड, गटविकास  अधिकारी गणेश बोथीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, सरपंच ज्ञानोबा मुटकुळे, कार्यकारी अभियंता दाणे, ग्रामसेवक, तलाठी, गावातील लाभार्थी, परिसरातील सरपंच उपस्थित होते.

औंढा नागनाथ तालुक्यातील आदिवासीबहुल गाव असलेल्या पिंपळदरी येथे आपला संकल्प विकसित भारत या संकल्पनेतून केंद्र शासनासह महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना तळागारातील गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी आपला संकल्प विकसित भारत यात्रा प्रत्येक गावामध्ये पोहोचवण्यासाठी यात्रा आज आली होती. यावेळी लाभार्थ्यांना विविध योजेनची माहिती देऊन त्यांची नोंदणी करण्यात आली व त्याना लाभ मिळवून देण्यात आला. तसेच उपसरपंच गणेश डुकरे यांच्या शेतामध्ये ड्रोनन यंत्राद्वारे कोणती कामे करता येतात याबाबतचे प्रात्यक्षिक करुन दाखवण्यात आले. या कार्यक्रमाला माजी आमदार रामरावजी वडकुते, सरपंच सौ. रत्नमाला भुरके, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य संजय भुरके, गटविकास अधिकारी बालाजी गोरे, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, नायब तहसीलदार लता लाखाडे, गट शिक्षणाधिकारी तानाजी भोसले, बाल विकास प्रकल्प अधिकारी संगीता इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी अनुराधा गोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी व वारंगा मसाई येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आज आगमण  झाले. येथील कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, महिला व बालकल्याण अधिकारी धापसे, विस्तार अधिकारी चेतन खैरनार, सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी , सर्व गावकरी मंडळी, महिला उपस्थित होत्या. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह प्रक्षेपण थेट संवाद कार्यक्रम चित्ररथाद्वारे दाखविण्यात आले. तसेच आयुष्यमान भारत कार्डचे वाटप, ड्रोन प्रात्यक्षिक व विविध योजनांची माहिती  तसेच आरोग्य तपासणी शिबिर  कार्यक्रम राबविण्यात आले. 

वसमत तालुक्यातील कानोसा येथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनेच्या लाभार्थींची संवाद कार्यक्रमप्रसंगी तहसीलदार शारदा दळवी, गट विकास अधिकारी उमाकांत तोटावाड, सह गटविकास अधिकारी सुनील अंभोरे, तालुका आरोग्य अधिकारी काळे तसेच तालुकास्तरीय सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog