प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी येथे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट, समस्या सोडविण्याचे आश्वासन
तळा : नजीर पठाण :- नवनिर्वाचित सरपंच सौ. लता उमेश करंजे, उपसरपंच श्री अनंत लोखंडे, सदस्य - गितीशा दांडेकर, सदस्य - किशोरी करंजे , सदस्य - वसीम बाणकोटकर, माजी पोलीस पाटील - विठ्ठल देवकर, माजी अध्यक्ष कृष्णा मालुसरे, अध्यक्ष सुरेश करंजे, उमेश करंजे, क्लार्क विजय शीलकर यांनी दिनांक ०४ डिसेंबर २०२३ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मांदाड, आदर्श माध्यमिक विद्यामंदिर मांदाड, रा.जि.प शाळा मांदाड, अंगणवाडी मांदाड,, उर्दू शाळा मांदाड, रा.जि.प. शाळा कुडे या शासकीय वास्तूंना भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या आपल्या समस्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन असे सरपंच सौ. लता उमेश करंजे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी उपस्थित गुरुजन वर्ग आणि कर्मचारी यांना सांगितले. आम्ही येथे सर्विस करत असतानाच्या कालावधीत आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी ग्रामपंचायत कडून असा कधी प्रयत्न झाला नाही. परंतु आपण खुर्चीवर बसुन 15 दिवस झाले अणि एवढ्या जलद गतीने आमची भेट घेण्यासाठी आलात यात आम्हाला अधिक समाधान आहे असे भावनात्मक शब्द उद्गारत नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना पुढील वाटचालीस शुभेच्या देत सर्वानी आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment