आमृतनाथ स्वामी श्री क्षेत्र दत्तमंदिर पुगांव ते आळंदी देवाची पायी दिंडीचे प्रस्तान

कोलाड (विश्वास निकम,रायगड भुषण) :-  श्रीमत सद्गुरू पद्मनाभाचार्य स्वामी शिष्य संप्रदाय अमृतनाथ स्वामी श्री. क्षेत्र दत्तमंदिर पुगांव ते आळंदी देवाची पायी दिंडी सोहळ्याचे मिती कार्तिक वद्यपंचमी शुक्रवार दि १/१२/२०२३ रोजी दिंडीचे प्रस्तान झाले आहे.

 या दिंडीची कोलाड हिल सोसायटी मध्ये आगमनाने सुरवात केली. असुन दरवर्षी प्रमाणे रविंद्र तारू यांनी या पालखीचे स्वागत केले व रविंद्र तारू व त्यांची पत्नी छाया तारू यांनी यांच्या हस्ते तुळशी पूजन केले.तसेच कोलाड हिल सोसायटीचे सेक्रेटरी संतोष मोरे, उपखजिनदार शैलेश यादव,रुपेश गोरिवले,प्रकाश साळवी,प्रभाकर मोरे, लाड काका, प्रणय लाड, विवेक कोळी, भास्कर मोरे,संतोष जाधव,तसेच सोसायटीचे असंख्य महिला वर्ग व सर्व सदस्य यांनी दिंडीचे स्वागत केले. 

 तसेच श्रीमंत सद्गुरू पद्मनामाचार्य स्वामी शिष्य सांप्रदयाच्या वतीने श्री नारायण धनवी यांनी रविंद्र तारू व छाया तारू यांचे श्रीफळ देऊन स्वागत केले. व नंतर पुढील मार्गासाठी दिंडीचे प्रस्थान झाले.

Comments

Popular posts from this blog