जासई रांजणपाडा गावात घरफोडी.
एकाच रात्री चार घरातील मौल्यवान दागिने आणि रोक रक्कम घेऊन चोरटे पसार.
उरण(विठ्ठल ममताबादे):- उरण तालुक्यातील जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रांजणपाडा गावातील बंद घरातील दरवाजांच्या कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी एकाच रात्रीत चार घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.रविवारी ( दि१०) रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी रांजणपाडा गावात धुमाकूळ घातल्याने रहिवाशी भिंतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रांजणपाडा गावातील श्रीमती आहिल्याबाई महादेव म्हात्रे हि महिला आपले घर बंद करून बाजूच्या घरात नेहमी प्रमाणे झोपायला गेली होती.तर प्रभाकर तुकाराम पाटील हे रात्र पाळीसाठी कामावर गेले होते,तसेच नामदेव आलू घरत, सुहास म्हात्रे हे रहिवाशी रविवारी ( दि१०) आप आपल्या घरी रात्रीच्या सुमारास घरी झोपी गेले होते.याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेऊन एकाच रात्री चार बंद घरातील दरवाजांच्या कडी कोयंडा कटरणी तोडून घरात प्रवेश केला.आणि कपाटाचे लाँक तोडून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच रांजणपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते रमाकांत म्हात्रे यांनी उरण पोलीसांना झालेल्या घटनेची माहिती दिली.उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देवून तात्काळ घडलेल्या घरफोडी चे पंचनामे सुरू केले आहेत.सदर चोरटे हे गावातील सी सी टिव्ही कँमेरात कैद झाल्याने लवकरात लवकर चोरटे जेरबंद केले जातील असे आश्वासन पोलीसांनी रहिवाशांना दिले आहे.मात्र या अगोदर ही रांजणपाडा गावातील श्री हनुमान मंदीरात चोरीची घटना घडली होती.त्या चोरीचा तपास आजतागायत न लागल्याने सध्या रहिवाशी भिंतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत.
Comments
Post a Comment