विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून वंचित घटकांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड : प्रतिनिधी :- केंद्र शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून  कृषी पर्यत विविध योजनाचा समावेश आहे.

11 डिसेंबर रोजी या गावात विकसित भारत संकल्प यात्रा

विकसित भारत संकल्प यात्रा उद्या 11 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लोणी खु., नांदेड तालुक्यातील नाळेश्वर, राहाटी, भोकर तालुक्यातील धानोरा, नारवट, बिलोली तालुक्यातील अटकळी, हुनगुंदा, देगलूर तालुक्यातील तुंबरपल्ली, शिळवणी तर कंधार तालुक्यातील गोगदरी, चिंचोली व किनवट तालुक्यातील मारेगाव बु. मोहपूर, लोहा तालुक्यातील हळदव, माहूर तालुक्यातील तुळशी, लसनवाडी, मुखेड तालुक्यातील अंबुलगा, लोणाळ, नायगाव तालुक्यातील अंचोली, नरंगल तर उमरी तालुक्यातील चिंचाळा येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील.

या मोहीमेत आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दिनदयाल अंत्योदय योजना आदीचा समावेश आहे. तसेच आदीवासी विभागासाठी विशेष योजना, स्कॉलरशिप योजना, वंदन योजना, उज्वला योजना, उजाला योजना अशा विविध विभागाच्या योजनाचा यात समावेश असणार आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनाचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ 15 नोव्हेंबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते किनवट येथे झाला. 15 जानेवारी 2024 पर्यत नांदेड जिल्ह्यातील अनेक गावामध्ये ही यात्रा पोहोचणार आहे. या यात्रेचे आगमन 10 डिसेंबर 2023 रोजी कंधार तालुक्यातील गुट्टेवाडी, कालका, किनवट तालुक्यातील दुंड्रा, रामपूर, लोहा तालुक्यातील देऊळगाव, मुखेड तालुक्यातील लिंगापूर या गावात झाले आहे.  या यात्रेदरम्यान विविध योजनामध्ये लाभार्थ्याचे फॉर्म, अर्ज भरुन घेण्यात आले आहे. तसेच मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान कार्डचे वितरण करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog