उरण मध्ये जागतिक दिव्यांग दिन विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा.
आमदारकीचा मानधन व पेन्शन दिव्यांगांसाठी वाटप करणारे माजी आमदार मनोहरशेठ भोईर हे 'अपंग मित्र' पुरस्काराने सन्मानित.
उरण(विठ्ठल ममताबादे) :- ३ डिसेंबर २०२३ म्हणजे जागतिक दिव्यांग दिन, संपूर्ण जगामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून जागतिक अपंग दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने दिव्यांग सामाजिक संस्था उरण यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन हा सोहळा जेएनपीटी मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून माजी आमदार मनोहरशेठ भोईर हे उपस्थित होते.तसेच आपला आमदारकीचे मानधन व पेन्शन दिव्यांगांसाठी वाटप करणारे माजी आमदार मनोहरशेठ भोईर त्याचप्रमाणे अरविंद घरत,संदिप म्हात्रे,भावनाताई घाणेकर विशाल पाटेकर आणि उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, जेएनपीटीचे माजी विश्वस्त काॅ. भूषण पाटील, सरचिटणीस संतोष पवार यांना आयोजक दिव्यांग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र म्हात्रे, आणि योगेश पाटील , समिर ठाकूर , राजेंद्र पाटील, संदेश राजगूरु यांच्या वतीने शेकडो अपंगांच्या उपस्थितीत अपंग मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना सन्मानित करण्यात आले. ओएनजीसी कंपनीच्या वतीने किराणा सामान असलेले उपयुक्त असे ८०० किटचे वाटप करण्यात आले.
तसेच जेएनपीटी कंपनी तर्फे सर्व दिव्यांग बांधवांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी दिव्यांग बांधवांना आयुष्यामान भारत आरोग्य कार्डचे वाटप देखील करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जेएनपीटीचे विश्वस्त भूषण पाटील, इंदिरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बी एम कालेल, ॲड भार्गव पाटील, यशवंत ठाकूर, मदन पाटील, प्रेमनाथ ठाकूर, दत्ता गोंधळी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाम ठाकूर यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग सामाजिक संस्था उरण यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते.दिव्यांगाच्या कल्याणासाठी रात्रंदिवस झटणारी व दिव्यांगाच्या अन्यायाला वाचा फोडणारी संस्था म्हणून दिव्यांग सामाजिक संस्था उरण ही सर्वांना सुपरिचित आहेत. दिव्यांग सामाजिक संस्थेच्या वतीने वर्षभरात अनेक विविध उपक्रम राबविले जातात. दिव्यांग सामाजिक संस्था उरण तर्फे दरवर्षी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो. यंदा रविवार दि ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११:३० ते दुपारी २ या वेळेत मल्टीपर्पज हॉल, जेएनपीटी टाउनशिप,उरण, जिल्हा रायगड येथे जागतिक दिव्यांग दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
Comments
Post a Comment