
पुनर्वसित गावांना सर्व नागरी सुविधा देणार - सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सातारा : प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग शासन अधिसुचना क्रमांक उब्नुएलपी - 1085 / सीआर/ 588 (१) एफ-5 दिनांक 16 सप्टेंबर अन्वये कोयना अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. संरक्षित क्षेत्रातील गावांचा विकास व वन्यजीव संवर्धनाचा सुवर्णमध्य गाठण्यासाठी संरक्षित क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन आवश्यक आहे. सातारा जिल्हयामध्ये सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील कोअर झोनमध्ये एकुण 52 गावांचे क्षेत्र समाविष्ठ आहे. त्यापैकी 19 गावे कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे पुर्वीच पुनर्वसित झालेली आहेत. तसेच 18 गावांचे अभयारण्यातील हक्क कायम केलेले आहेत. उर्वरित 15 गावांचे पुनर्वसन अभयारण्याबाहेर करावयाचे आहे. त्यापैकी 10 गावांची पुनर्वसन झाले असुन 5 गावांचे पुनर्वसन प्रक्रिया सुरु आहे. ज्यामध्ये मौजे वेळे ता.जावली या गावाचा समावेश आहे. सदर गावामध्ये एकुण 135 प्रकल्पग्रस्त असुन त्यापैकी 61 प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खंडाळा मधील 112.25 हे. आर वनक्षेत्रावर करण्यात येत आहे. सदर खातेदारांचे पुनर्वसन करणेकामी 112.25 हे. आ...