रोह्यात जप्त केलेल्या शस्त्रसाठा प्रकरणी अग्निशस्रासह आणखी एकास अटक

स्थानिक गुन्हे शाखा, रायगडची कामगिरी 

रोहा : प्रतिनिधी :- सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेस मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे रोह्यातील तन्मय भोगटे (वय-24 वर्ष) याचे घरझडतीमध्ये रिव्हॉलर, बारा बोर बंदुके, चाकु, तलवारी, जिवंत काडतुसे, बंदुक बनविण्याचे साहित्य, विविध प्राण्यांची शिंगे व इतर शस्त्रसाठा सापडला होता. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान अटक आरोपीने त्याने बनविलेले ठासणीची बंदुक लक्ष्मण जानु हिलम (वय-40 वर्ष) रा. तारणे अदिवासीवाडी, ता.तळा यास दिले असल्याचे समजल्यावर लक्ष्मण हिलमला ताब्यात घेतले, त्याचेकडे एक ठासणीची बंदुक सापडली. पोलीसांनी लक्ष्मण जानु यास अटक करून बंदूक जप्त केली आहे. अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे करीत आहेत.

सदरची कामगिरी रायगड जिल्हयाचे मा. पोलीस अधिक्षक, सोमनाथ घार्गे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक, अतुल झेंडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, बाळासाहेब खाडे यांचे अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक, धनाजी साठे व तपास पथकाने केली आहे

Comments

Popular posts from this blog