ग्रामपंचायत पागोटे तर्फे शिवस्मारकाचे लोकार्पण
उरण (विठ्ठल ममताबादे):- २०२२ साली महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसमर्थ परिवर्तन आघाडीची विजयाची वर्षपूर्ती व वचनपूर्ती सोहळा निमित्त १९८४ च्या गौरवशाली शेतकरी लढ्यातील पंच हुतात्म्यांना अभिवादन करुन पागोटे ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवार दिनांक २ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य दिव्य अशा शिवस्मारकाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आले. पागोटे गावात रायगड जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बसविण्यात आलेल्या हुतात्म्याना सर्वप्रथम मानवंदना देण्यात आले त्यानंतर माजी आमदार मनोहरशेठ भोईर व माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते शिवस्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.हुतात्मा स्मारक नुतनीकरणाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, गावाकऱ्यांचे,नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालय आवारातच शुद्ध पिण्याच्या पाणी (आर. ओ प्लान्ट)चे लोकार्पण मनोहरशेठ भोईर, बाळाराम पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर,शेकाप तालुका चिटणीस विकास नाईक, पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर,शेकाप जेष्ठ कार्यकर्ते महादेव बंडा, मु. ग. पाटील गुरुजी,मनोहर पाटील, शिवसेना जेष्ठ कार्यकर्ते रमेश पाटील, अनिल पाटील महेश पाटील शिवसेना युवा नेते दिपक भोईर,शेकाप कार्यकर्ते विनोद पाटील, सुमित पाटील शिवसेना कार्यकर्ते महेंद्र पाटील,भाजपा कार्यकर्ते भारत पाटील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुनिल तांडेल , आदर्श शिक्षिका दर्शना माळी,शिवसेना कार्यकर्त्या मनीषा ठाकूर,तृप्ती भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच कुणाल पाटील , उपसरपंच सतिश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुजित तांडेल , अधिराज पाटील, मयूर पाटील , महिला सदस्य प्राजक्ता पाटील, समृध्दी तांडेल, करिश्मा पाटील, सुनिता पाटील, सोनाली भोईर, ग्रामसुधारणा मंडळाचे पागोटेचे अध्यक्ष प्रकाश भोईर,उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील,सचिव शैलेंद्र पाटील,खजिनदार ऋषिकेश म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेतली. फुंडे हायस्कूलच्या विदयार्थ्यांनी स्वागता वेळी लेझीम सादर करत मान्यवरांचे स्वागत केले.या कार्यक्रमाला व सोहळ्याला महत्वाचे योगदान दिल्या बद्दल माजी आमदार मनोहरशेठ भोईर,माजी आमदार बाळाराम पाटील यांचे जाहीर सत्कार करण्यात आला.ग्रामपंचायत पागोटे व शिवसेना शाखा पागोटे यांच्या पाठपुराव्याने शिवस्मारकाचे काम पुर्ण करण्यात आले. शिवस्मारकांचा सर्व खर्च माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी केला आहे.सदर कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसिद्ध निवेदक आतिश पाटील यांनी केले.
उरणच्या इतिहासात प्रथमच बँजो बिट्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या बँजो बिट्स स्पर्धेमध्ये एकूण पाच संघाने सहभाग घेतला होता. दुर्गादेवी बँजो बिट्स पागोटे , जय मल्हार बिट्स केळवणे, विघ्नहर्ता बिट्स उरण, मुळेखंड बिट्स मुळेखंड,खंडोबा बिट्स सोनारी या पाच संघाने बँजो बिट्स स्पर्धेत सहभाग घेतला होता. यापैकी खंडोबा बिट्स सोनारी बँजो पथकाने प्रथम क्रमांक पटकविला.एकंदरीत उरण तालुक्यात प्रथमच भव्य दिव्य अशा बँजो बिट्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने वादकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. अशा प्रकारे पागोटे गावात शिवस्मारक लोकार्पण सोहळा व बँजो बिट्स स्पर्धा मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाले.
Comments
Post a Comment