सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या जित बंगाली यांनी सोडले विमला तलावात बदक.
उरण (विठ्ठल ममताबादे) :- सामाजिक क्षेत्रात तसेच पर्यावरण क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणा-या व प्रसिद्धी पासून लाखो कोस दूर असणाऱ्या उरण मधील सामाजिक कार्यकर्ते जित बंगाली यांनी आपल्या स्वः खर्चातून सामाजिक बांधिलकी जपत दोन बदके विकत घेउन ती उरण शहरातील विमला तलावात सोडली.पर्यावरणाचे संतुलन राहावे तसेच विमला तलावात (गाईन मध्ये) फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे मनोरंजन व्हावे. या दृष्टीकोनातून त्यांनी दोन बदके स्वखर्चाने विमला तलावात सोडली आहेत. एकीकडे वन्यजीव पशुपक्षी यांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर असताना पशु पशुपक्ष्यांना पिंजऱ्यात बंदिस्त न ठेवता त्यांना मनमोकळे पणाने जगू देण्याचा देण्याचा सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवाद्यांचा प्रयत्न आहे.जीत बंगाली यांनी पशुपक्ष्यांच्या अस्तित्वासाठी उचललेले हे पाउल सर्वासाठी निश्चितच आदर्श व प्रेरणादायी आहे.
Comments
Post a Comment