रोह्यात नार्वेकरांचा निषेध
रोहा : प्रतिनिधी :- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्षपाती निर्णय देताना लोकशाहीचा खून केला, याचा निषेध म्हणून गुरुवारी शिवसेना रोठबुद्रुक शाखेतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी काळे झेंडे दाखवले गेले तसेच नार्वेकर विरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी रोहा शहरप्रमुख दीपक तेंडुलकर, रोहा उपतालुकाप्रमुख महादेव साळवी, श्रीवर्धन मतदारसंघ अधिकारी राजेश काफरे, धाटाव विभाग प्रमुख नितीन वारंगे, शाखा प्रमुख निलेश वारंगे, ग्राहक संरक्षण तालुका प्रमुख अनिश शिंदे, महिला संघटिका रोहिणी गोसावी, सुप्रिया वारंगे, प्रकाश वालीवकर, संजय देऊळकर, दुर्गेश नाडकर्णी, यशवंत गोसावी, महेश खांडेकर, भारत वाकचौरे, आदित्य कोंडाळकर, राम महाडिक, मनोज लांजेकर, आनंद भुवड, संकेत जाधव, नरेश गायकर, संकेत भोसले, गणेश कदम, किसन खोत, नवनीत ठाकूर आदी शिवसैनिक उपस्थित होते
Comments
Post a Comment