रोहा तालुक्यात मनसेला मोठा फटका बसण्याची शक्यता

रोहा : प्रमोद गायकवाड :- रोहा तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला भला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.रोहा तालुक्यातील सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धाटाव विभाग अध्यक्ष रितेश कीर्तने यांनी भाजप पक्षामध्ये जाहीर प्रवेश केल्याची घटना समोर आलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्रजी चव्हाण व रोहा तालुका अध्यक्ष श्री अमित घाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना धाटाव सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष रितेश कीर्तने यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेले पाहायला मिळत आहे. 

रितेश कीर्तने यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्ये खूप मोठ्या पद्धतीत वजन असल्याच रोहा तालुक्यातील नागरिकांकडून  म्हटले जात आहे. रितेश कीर्तने हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षांमध्ये काम करत असताना तळागळात पोचून अनेक नागरिकांचे आपल्या पक्षांमध्ये जाहीर प्रवेश करून घ्यायचे व  निश्चित नागरिकांच्या काही समस्या असल्यास सोडविण्याचे  प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे अनेक युवक त्यांच्या कामाची पर्सनॅलिटी पाहून पक्षांमध्ये  प्रवेश करण्यात इच्छुक असायचे परंतु रितेश भाऊ कीर्तने यांनी भारतीय जनता पार्टी पक्ष मध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांचे सोबतच्या सहकाऱ्यांचा मन दुखवलं गेल्याची घटना पाहायला मिळत व रितेश भाऊ कीर्तन यांच्या माध्यमातून असं समोर येत आहे.

येत्या काही दिवसांन पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते यांच्या वरती रितेशभाऊ कीर्तने याच्या मनामध्ये  काही खंत असल्यामुळे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आलेला आहे आणि  रितेश भाऊ कीर्तने यांच्यासोबत दहा ते पंधरा युवकांनी देखील भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहेत तर या युवकांनाही भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून नवीन ऊर्जा निर्माण होईल असे देखील रितेश कीर्तने यांच्या माध्यमातून म्हटले जात आहे.

Comments

Popular posts from this blog