महादेव सरसंबे यांना पुढारी पुरस्कार प्रदान
कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- रोहा तालुक्यातील दै.पुढारी पेपरचे रोहा विभागीय प्रतिनिधी,उपसंपादक तसेच ओबीसी जन मोर्चाचे रोहा तालुका सरचिटणीस महादेव सरसंबे यांनी दै. पुढारी पेपरमध्ये गेली दहा वर्षा पासुन उल्लेख निय कार्य करून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पुढारी पेपर तर्फे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुढारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
महादेव सरसंबे हे गेली २३ वर्षांपासून ग्रामीण भागातील रस्ते,पाणी,शिक्षण,आरोग्य,तसेच इतर समस्या पत्रकारितेच्या माध्यमातून शासन दरबारी पोहचविण्याचे काम करून लोकांना न्याय देण्याचे काम करीत असुन जनसामन्यात खरा पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच ते असंख्य पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन करीत असतात.
त्याच्या उल्लेखनिय कार्याबद्दल महादेव सरसंबे यांना मंगळवार दि.२३ जानेवारी २०२३ रोजी अलिबाग कुरूळ येथी क्षात्रेक्य समाज हॉल येथे पुढारी पेपरच्या वर्धापन दिनानिमित्ताने महिला व बाळ कल्याण मंत्री आदिती तटकरे,यांच्या हस्ते व रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ, बांधकाम सभापती डॉ. चित्रा पाटील, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे,प्रथमेश लघाटे, शमिका भिडे उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल ओबीसी जन मोर्चाचे रोहा तालुका अध्यक्ष सुरेश मगर, रोहा प्रेसचे अध्यक्ष सुहास खरिवले,महेश बामुगडे,नरेश कुशवाह,महेंद्र माने,व्ही एन.जंगम,नितेश सकपाळ,विश्वास निकम,श्यामभाऊ लोखंडे,निलेश ठमके,महेश पवार,महेंद्र म्हात्रे,सचिन भोसले, समीर बामुगडे, यांच्यासह विविध क्षेत्रातील असंख्य नागरिकांनी महादेव सरसंबे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment