भगवंताच्या नामस्मरणाने महापातकीय माणसांचा उद्धार होतो:-ह.भ.प. निलेश महाराज पवार 

  कोलाड  (विश्वास निकम, रायगड भूषण):- ज्यांचा अंगीकार नारायणाने केला तो जगात नींदनीय जरी असले तरी त्यांने त्यांना वंदय केले असे  मत हेदवली येथील श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा नामस्मरण सोहळा निमित्ताने आयोजित किर्तन सेवेत ह.भ.प.निलेश महाराज पवार (चिपळूण )यांनी अंगीकार ज्याचा केला नारायणे l नींदे ते हि तेणे वंद्य केले ll१ll आजमेळ भिल्ली तारीली कुंटणी प्रत्येक्ष पुराणी वंद्य केली ll  धु ll ब्रम्हहत्याराशी पातकें अपार  ll वाल्मिकी किंकर वंद्य केला ll२ll तुका म्हणे येथे प्रमाण l काय थोरपणा जाळावे तें l या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे स्पष्ट केले.

अभंगाचा अर्थ स्पष्ट करतांना हभप निलेश महाराज पवार यांनी सांगितले कि उदाहरण दयायचे म्हटले तर आजामेळ भिल्ल शबरी गणिका वेश्या हि जरी पापी तरी नामस्मरणाने त्यांना तारले त्यांना वंदय केले हे तर पुराणात सांगितले आहे.परंतु ब्रम्हहत्याची रासच ज्याच्या हातुन घडली ज्याने अनेक महापातके केली अशा वाल्मिकीचा देखील राम नामाच्या नामस्मरणाने उद्धार झाला.त्याला सर्वत्र वंदय केले.तुकाराम महाराज म्हणतात या नारायणाने सर्वांचा अंगीकार केला कारण येथे तुझे नाम भजन प्रमाण आहे.बाकीचा मोठे पणा काय जालायचा आहे. 

 यावेळी गायनाचार्य रवि महाराज मरवडे,राम महाराज दळवी, नारायण महाराज लाड,मृदूंगमणी संजय महाराज म्हसकर,चैतन्य महाराज गायकर,नाना महाराज शिरसे,जितेंद्र महाराज धामणसे,चंद्रकांत महाराज बाईत, महेश महाराज शिरसे, निलेश महाराज चव्हाण,जोस्ना ताई खांडेकर,रवि महाराज यादव,,प्रफूल महाराज कनघरे,तसेच ऐनघर, कोलाड,खांब आमडोशी पंचक्रोशीतील असंख्य भाविक उपस्थित होते. 

 सर्व कार्यक्रम यशश्विकरण्यासाठी तानाजी लाड,तुकाराम गायकर,महादेव आवसरे,अनिल लाड,संतोष लाड,उत्तम जाधव,रोहिदास लाड,उमाजी गायकर,संजीव आवसरे,चंद्रकांत दळवी,महादेव कालेकर,प्रभाकर उमासरे, श्री ब्रम्हचैतन्य सेवा मंडळ,ग्रामस्थ मंडळ,तरुण मंडळ,महिला मंडळ,श्री.आदिमाया मित्रमंडळ हेदवली यांनी मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog