कराटे चॅपियन स्पर्धेत भक्ती विजय भोईरने पटकाविले गोल्ड मेडल.
उरण (विठ्ठल ममताबादे):- शौर्य मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अकॅडमी रायगड यांच्या वतीने दुसरी रायगड जिल्हा स्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा जय किसान विदयामंदिर पटांगण वडखळ जिः रायगड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे खेळल्या जाणाऱ्या कुमारी भक्ति विजय भोईर हिने काता प्रकारात गोल्ड मेडल तर कुमिते प्रकारात गोल्ड मेडल पटकाविले आहे. तसेच तनिष्का नितीन ठाकूर काता प्रकारात गोल्ड मेडल कुमीते प्रकारात सिल्वर मेडल, स्वरा सुनिल पेढवी हिने काता प्रकारात सिल्व्हर मेडल कुमिते प्रकारात गोल्ड मेडल, ओम योगेश पाटील याने काता प्रकारात सिल्व्हर मेडल कुमिते प्रकारात गोल्ड मेडल पटकाविले. रीयांशी राजेश कालेल काता प्रकारात गोल्ड मेडल, तनिष वैभव मढवी काता प्रकारात सिल्वर मेडल कुमिते प्रकारात ब्राझ मेडल,कु. आशा शरद सोनावणे कुमिते प्रकारात ब्रॉन्झ मेडल काता प्रकारात गोल्ड मेडल,भूमी प्रकाश पाटील ब्राँझ मेडल,जतीन रामचंद्र म्हात्रे ब्राँझ मेडल, दिक्षा अर्जुन वग्रे ब्रॉन्झ मेडल, नैतिक संजय घरत ब्रॉन्झ मेडल असे विविध स्पर्धकांनी गोल्ड मेडल सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल पटकाविले आहेत. या विजयी स्पर्धकांना कोच दिपक घरत (थर्ड डिग्री ब्लँकबेल्ट ), प्रगती घरत (सेकंड डिग्री ब्लॅक बेल्ट ), मिलन जाधव (सेकंड डिग्री ब्लॅक बेल्ट ), अजय तांडेल (ब्लॅक बेल्ट ), सोनल तांडेल (ब्लॅक बेल्ट )यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहेत. या सर्वच विजयी उमेदवारांवर,स्पर्धकांवर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.विजय विकास सामाजिक संस्थेचे विजय भोईर, विकास भोईर यांनीही सर्व विजयी स्पर्धेकांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment