भाजपा युवा मोर्चा रोहा तालुका अध्यक्ष पदी कुणबी समाजाचे युवा नेते श्री. महेशदादा ठाकुर यांची पुन्हा निवड

रायगड : सचिन सगळे :- भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, पनवेल चे आमदार प्रशांत दादा ठाकुर,पेण चे रवीशेठ पाटील साहेब,लोकसभा संघटक सतीशजी धारप साहेब,भाजपा जिल्हाध्यक्ष मा आमदार धैर्यशील दादा पाटील,अलिबाग विधानसभा प्रमुख श्री दिलीप भोईर (छोटम शेठ), श्रीवर्धन विधानसभा प्रमुख प्रशांत शिंदे, पेण विधानसभा प्रमुख प्रसाद दादा भोईर, पेण विधानसभा संयोजक वैकुंठ शेठ पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेशजी थोरे या सर्वांच्या मान्यतेने आणी मार्गदर्शनाखाली रोहा तालुक्यातील कुणबी समाज्याचे डॅशिंग युवा नेतृत्व महेशजीं ठाकुर यांची पुन्हा रोहा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा पदी निवड केली आहे. निवडीचे पत्र तालुका मंडळ अध्यक्ष अमितजी घाग यांनी दिले 

रोहा तालुक्यातील प्रत्येक घरा घरात महेशदादा ठाकुर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून घर चलो अभियान मार्फत तीन हजार लोकांपर्यंत घर चलो अभियानमार्फत पोहचविले आहे,2008 साली संभे ग्रामपंचायत निवडणूकित बिनविरोध निवडून येऊन त्यानंतर सतत तीन वेळा आपल्या गावातील पूर्ण पॅनल निवडून आणण्याची किमया युवा नेते महेश ठाकुर यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जनतेसाठी सतत काम करण्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवा मोर्चा साठी आलेले प्रत्येक काम,आंदोलन,मोर्चा हे यशस्वी पणे महेश ठाकुर करीत आहेत,छत्रपती संभाजी महाराज जलकलश यात्रा, मेरी माठी मेरा देश अमृत कलश यात्रा दिल्ली ला रायगड जिल्हा युवा मोर्चाची नेवून स्वतः प्रतिनिधित्व केले, आयुष्यमान भारत कार्ड शिबीर,तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय कब्बड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा यामधून सतत युवकांच्या संपर्कात राहणे,आभा कार्ड, आरोग्य शिबीर करणे,आर्थिक सहाय्यता शिबीर,आदिवासी समाज्यासाठी जातींचे दाखले वाटप शिबीर, रोहा तालुक्यातील रेशनिंगi घोटाळा उघडकीस आणला व कारवाई साठी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे पाठपुरावा सतत चालू आहे,तसेच विविध योजना राबविल्याबद्दल धन्यवाद मोदीजी उपक्रम हे रोहा तालुक्यातील तीन हजार पाचशे लोकांपर्यंत त्यांनी पोहचवीले आहे. येणाऱ्या कालावधी मध्ये घर चलो अभियान दहा हजार लोकांपर्यंत घर चलो अभियान राबविणार असा संकल्प महेश ठाकुर यांनी केला आहे आतापर्यंत तीन हजार लोकांपर्यंत घर चलो जनसंपर्क अभियान राबविला आहे बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, युवा वोरियार्स, भाजपा जेष्ठ नेते, पदाधिकारी कार्यकर्ते, महिला मोर्चा, युवा मोर्चा, रोहा तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम करणारे अशा भावना प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्या मनात महेश दादा ठाकुर यांच्या बद्दल आहे,प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील होणे,मोठा दांडगा जनसंपर्क ही महेश ठाकूर यांची मोठी शक्ती आहे.

भाजपा नेतृत्वाने रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष पदी पुन्हा संघर्ष करणाऱ्या, कुणबी समाज्याचे डॅशिंग युवा नेते महेश ठाकुर यांना पक्ष नेतृत्वाने संधी दिल्याबद्दल रोहा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog