रा.जि.प प्राथमिक शाळा तामसोली सावरट येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- रोहा तालुक्यातील रा.जि.प.प्राथमिक शाळा तामसोली सावरट येथील विद्यार्थ्यांना २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी सकाळी ७.०० वा. संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डाकी सर यांच्या शुभेहस्ते झेंडा वंदन करण्यात आले.यानंतर सामाजिक कार्यकर्ते मनोज शिरसे व त्यांचे सहकारी मित्र पांडुरंग बागकर यांच्यावतीने शाळेतील ५० विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सुरुवातीला लहान मुलांनी इंग्रजी,हिंदी व मराठी भाषेत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली.त्यानंतर ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय शिरसे,बालक पालक सभेचे अध्यक्ष राहुल हलदे, पोलीस पाटील महेश शिरसे,यशवंत हलदे,मनीष कदम,केशव डोबले,नाना महाराज शिरसे,बाबुराव भाऊ शिरसे,परशुराम शिरसे,मंगेश शिरसे,रवींद्र यादव,संजय शिरसे,अनिल चव्हाण,मंगेश कणघरे,दिलीप शिरसे, सुनिल ढाने,महेंद्र कणघरे,सुधीर ढाणे,दिनेश भोईर,सखाराम हलदे,विशाल शिरसे,मानसी कणघरे,विशाखा पार्टे,वैदेही शिरसे,रुचिता हलदे, सुगंधा शिरसे,योगिनी हलदे, जयश्री घरट.यांच्यासहीत असंख्य ग्रामस्थ,तरुण वर्ग महिला वर्ग उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्हात्रे सर यांनी केले तसेच कार्यक्रमाची सांगता खाऊ वाटप करून करण्यात आली.
Comments
Post a Comment