शिक्षिका शर्मिला गावंड, जान्हवी कडू शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित.
उरण (विठ्ठल ममताबादे):- महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्या वतीने माणगाव गोरेगाव येथे रायगड जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांना पुरस्कार देवून त्यांचा गुणगौरव करण्यात आला. रायगड मधील एकूण तीस शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार देण्यात आले. उरण तालुक्यातील उपक्रमशील शिक्षिका व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी अध्यापन करून नावीन्यपूर्ण अध्यापन करत असणाऱ्या ,काही दिवसापूर्वी द्रोणगिरी पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या शर्मिला महेंद्र गावंड यांना तसेच रानसई शाळेच्या शिक्षिका जान्हवी जितेश कडू यांना शिक्षक रत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
सदर पुरस्कार वितरणासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे ,आमदार भरतशेठ गोगावले, ठाण्याचे आमदार संजयजी केळकर, महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेशजी सुर्वे , जिल्हा अध्यक्ष विजयजी पवार यांच्या उपस्थितीत हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला.शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षिका शर्मिला गावंड, जान्हवी कडू यांना मान्यवरांच्या हस्ते शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment